AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तहसीलदारासह डीवायएसपी निलंबित, पुण्यात निवडणूक आयोगाची सर्वात मोठी कारवाई

केंद्रीय निवडणूक आयोगाने पुरंदरमधीव ईव्हीएम चोरीच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे.

तहसीलदारासह डीवायएसपी निलंबित, पुण्यात निवडणूक आयोगाची सर्वात मोठी कारवाई
आपण ज्या उमेदवाराला किंवा चिन्हाला मतदान केलंय., ते त्याच उमेदवाराला झालं आहे की नाही., याच्या पडताळणीसाठी व्हीव्हीपॅटचा उपयोग होतो.
| Updated on: Feb 07, 2024 | 7:25 PM
Share

पुणे | 7 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने पुरंदरमध्ये मोठी कारवाई केली आहे. पुरंदरमध्ये ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याची घटना नुकतीच समोर आली होती. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ईव्हीएम हे अतिशय महत्त्वाचं मशीन आहे. लोकशाही जपण्यासाठी आणि निवडणुकीच्या अतिशय महत्त्वाच्या प्रक्रियेसाठी ते वापरलं जातं. त्यामुळे ईव्हीएम मशीनची निगा राखण्यात प्रशासन कुठेतरी कमी पडलं असावं, अशी चर्चा सुरु होती. अखेर संबंधित प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणी अतिशय मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याप्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी या तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून मुख्य सचिवांनी तात्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करावा, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनीही तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलं आहेत. तसेच एका पोलीस अधिकाऱ्यालाही निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता आणखी तीन बड्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी झाली होती. संबंधित घटना ही सोमवारी (5 फेब्रुवारी) समोर आली होती. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या होत्या. पण दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँगरूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आढळून आलं. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीनमधून एक ईव्हीएम मशीन चोरी गेल्याची माहिती समोर आली. यानंतर तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांची चांगलीच धावपळ झाली होती. सासवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी, फिंगरप्रिंट एक्सपर्टची टीम, एलसीबीची टीम असे पोलिसांचे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. याप्रकरणी दोघांना अटक करण्यातव आली होती.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.