आरोपींच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रं, पिंपरीत टोळीचा भांडाफोड, सहा जण अटकेत

| Updated on: Jun 18, 2021 | 3:59 PM

चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, पॉक्सो यांसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींना जामीन करुन देण्यासाठी बनावट आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सातबाराचे उतारे करणारी टोळी कोर्ट परिसरात सक्रिय होती.

आरोपींच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रं, पिंपरीत टोळीचा भांडाफोड, सहा जण अटकेत
2013 मधील हत्या प्रकरणी औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Follow us on

पिंपरी चिंचवड : गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करून चक्क न्यायालयाची दिशाभूल केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. पिंपरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात सहा जणांना अटक केली आहे. पुणे परिसरात आरोपींना जामीन करुन देण्यासाठी कोर्टाबाहेर बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. (Fake documents for bail of  accused Pimpri Chinchwad Police busted Gang)

काय करायची टोळी?

चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, पॉक्सो यांसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींना जामीन करुन देण्यासाठी बनावट आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सातबाराचे उतारे अशी शासकीय कागदपत्रे तयार करणारी एक टोळी पिंपरी आणि पुणे कोर्ट परिसरात सक्रिय होती. या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे चक्क न्यायालयाची दिशाभूल केली.

बनावट शासकीय दस्तऐवज 

पिंपरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात सहा जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपी शिवाजीनगर कोर्ट पुणे आणि इतर कोर्टामध्ये गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन करून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करत असत. त्यामध्ये आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सातबाराचे उतारे अशी शासकीय दस्तऐवज जामीन मिळवून देण्यासाठी तयार केली जात.

सहा जणांना अटक

आरोपींनी न्यायालयाची दिशाभूल करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील अटक आरोपींचा जामीन करून घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वारंवार वापर केला आहे. बनावट नावाची बोगस कागदपत्रे पिंपरी न्यायालय येथे बोगस जामीनदार म्हणून हजर राहण्यासाठी आरोपींनी स्वतःजवळ बाळगली आहेत. हे प्रकरण पिंपरी परिसरात उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक करून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. पिंपरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

मानलेल्या भाच्यासोबत संबंधाचा संशय, डोंबिवलीत काकाने अल्पवयीन पुतणीचा जीव घेतला

शाळेत हजेरी का घेतली नाही? मुख्याध्यापिकेच्या पतीची शिक्षकाला अर्वाच्च शिवीगाळ

(Fake documents for bail of  accused Pimpri Chinchwad Police busted Gang)