AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेत हजेरी का घेतली नाही? मुख्याध्यापिकेच्या पतीची शिक्षकाला अर्वाच्च शिवीगाळ

परळीतील शाळेतल्या मुख्याध्यापिकेचे पती केशव निवृत्तीराव भांगे यांनी सतीश जाधव यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे

शाळेत हजेरी का घेतली नाही? मुख्याध्यापिकेच्या पतीची शिक्षकाला अर्वाच्च शिवीगाळ
परळी पोलीस स्टेशन
| Edited By: | Updated on: Jun 18, 2021 | 1:34 PM
Share

संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, परळी, बीड : शाळेत हजेरी का घेतली नाही? या क्षुल्लक कारणावरुन मुख्याध्यापिकेच्या पतीने शिक्षकाला अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्याध्यापिकेचे पती केशव भांगे हे याच शाळेत लिपिक पदावर कार्यरत आहेत. बीड जिल्ह्यातील परळी शहरात ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. (Parli Beed Head Mistress Husband allegedly abused teacher audio clip revealed)

अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

परळी शहरातील महर्षी कणाद विद्यालयामध्ये शिक्षक सतीश जाधव हे मागील 19 वर्षांपासून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देण्याचे काम करतात. मुख्याध्यापिकेचे पती केशव निवृत्तीराव भांगे हेसुद्धा याच शाळेवर लिपिक पदावर कार्यरत आहेत. भांगे यांनी जाधव यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकाराची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

शिक्षक सतीश जाधवांचा आरोप काय?

“16 तारखेला मी घरी येत असताना संस्थाचालकांचे चिरंजीव केशव भांगे यांचा मला फोन आला. त्यांनी थेट शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यांनी मला अर्वाच्च, जातीवाचक शिवीगाळ केली. त्यांनी मला आणि कुटुंबाला संपवण्याची भाषा केली. माझी नोकरी घालवण्याचीही धमकी दिली. शाळेत आलास, तर गेटवरच खल्लास करेन, असं धमकावलं. कारण काय, तर आमच्या मुख्याध्यापिका मॅडम म्हणजे त्यांच्या पत्नीच्या वर्गाची हजेरी का घेतली नाही. तू आमचा गुलाम आहेस, नोकर आहेस, तुला असं वागावंच लागेल, असं म्हणाले. मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती करायची आहे, की त्यांनी माझ्यासह कुटुंबाला संरक्षण देऊन न्याय द्यावा” अशी मागणी तक्रारदार सतीश जाधव यांनी केली आहे.

परळी पोलिसात गुन्हा दाखल

शाळेसारख्या पवित्र वास्तूत घडलेल्या प्रकारामुळे शाळेतील इतर शिक्षकांमध्ये दहशत पसरली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकाराची एक ऑडिओ क्लिप समोर आली असून या ऑडिओ क्लिप मध्ये भांगे अर्वाच्च भाषेत शिक्षकाला शिवीगाळ करत असल्याचं ऐकू येत आहे.

मुख्याध्यापिकेच्या पतीकडून प्रतिक्रियेस नकार

दरम्यान, या प्रकरणाची दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, मुख्याध्यापिकेच्या पतीने मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. आता पोलीस तपासाअंती हा सर्व प्रकार समोर येईल.

पाहा व्हिडीओ : संबंधित बातम्या :

सख्खा भाऊ पक्का वैरी, प्रॉपर्टीच्या वादातून आईला शिवीगाळ, भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉड टाकून हत्या

… तर अंगावर वर्दी ठेवणार नाही, पोलिसांना धमकी देत शिवीगाळ, औरंगाबादेत धक्कादायक प्रकार

(Parli Beed Head Mistress Husband allegedly abused teacher audio clip revealed)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.