मानलेल्या भाच्यासोबत संबंधाचा संशय, डोंबिवलीत काकाने अल्पवयीन पुतणीचा जीव घेतला

दारावर डोके आपटल्याने पुतणी गंभीर जखमी झाली होती. रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर तिला घरी आणले, मात्र पुन्हा ती बेशुद्ध पडली. त्यामुळे तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मानलेल्या भाच्यासोबत संबंधाचा संशय, डोंबिवलीत काकाने अल्पवयीन पुतणीचा जीव घेतला
पुतणीच्या हत्येप्रकरणी काकाला अटक

डोंबिवली : डोंबिवलीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या (Minor Girl Murder) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिच्या काकालाच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. डोंबिवली रामनगर पोलिसांनी आरोपी काका मयुरेश सफलिंगा याला अटक केली आहे. मानलेल्या भाच्यासोबत संबंध असल्याच्या संशयातून काकाने मारहाण करुन पुतणीचा जीव घेतल्याचा आरोप आहे. (Dombivali Crime Uncle arrested for Niece Murder)

पुतणीचे मानलेल्या भाच्यासोबत संबंधाचा संशय

डोंबिवली पूर्व भागातील त्रिमूर्ती नगर परिसरात सफलिंगा कुटुंब राहते. महेश सफलिंगा यांच्यासह पत्नी आरती, 14 वर्षाची मुलगी रोशनी, महेशचा भाऊ म्हणजेच आरोपी मयुरेश आणि मानलेला भाचा शंकर हे राहतात. मयुरेशला शंकर आणि रोशनी यांच्यात संबंध असल्याचा संशय आला.

आधी मानलेल्या भाच्याला मारहाण

17 जूनच्या पहाटे मयुरेश याने आपला भाऊ महेशला विचारले, की शंकर रोशनीच्या बाजूला का झोपला होता. मात्र रोशनी आणि शंकरने या संदर्भात स्पष्ट नकार दिला. परंतु मयुरेश काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सकाळी सात वाजताच्या सुमारास रिक्षा चालवून घरी परतल्यावर त्याने शंकरला मारहाण करण्यास सुरुवात केली.

पुतणीचे डोके दारावर आपटले

इतकेच नाही तर 14 वर्षीय रोशनीला सुद्धा मारहाण करत घराबाहेर नेले. दारावर तिचे डोके आपटल्याने रोशनी ही गंभीर जखमी झाली. रोशनी जखमी झाल्यावर तिची आई आणि काका तिला रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर रोशनीला घरी घेऊन आले. पुन्हा ती बेशुद्ध पडली. तिला डॉक्टरकडे नेले असता तिला डॉक्टरांनी मृत असल्याचे घोषित केले.

आरोपी काकाला अटक

काका मयुरेशने पुतणी रोशनीला बेदम मारहाण केली म्हणून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करीत काका मयुरेशला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

पाण्यावरुन किरकोळ वाद, 33 वर्षीय प्रवाशाचा ट्रेनबाहेर फेकल्याने मृत्यू, पुण्यातील प्रकार

कल्याणमधील तरुणाच्या मृत्यूचं गूढ उकललं, रिक्षाचालक पत्नीकडून दोन प्रियकरांच्या साथीने हत्या

(Dombivali Crime Uncle arrested for Niece Murder)