कल्याणमधील तरुणाच्या मृत्यूचं गूढ उकललं, रिक्षाचालक पत्नीकडून दोन प्रियकरांच्या साथीने हत्या

17 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कल्याणच्या प्रवीण पाटीलच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आले. प्रवीणच्या पत्नीसह तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे

कल्याणमधील तरुणाच्या मृत्यूचं गूढ उकललं, रिक्षाचालक पत्नीकडून दोन प्रियकरांच्या साथीने हत्या
कल्याण हत्ये प्रकरणी महिलेसह तिघांना अटक

कल्याण : 17 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाच्या हत्येचं गूढ उकलण्यात कल्याण पोलिसांना यश आलं आहे. रिक्षा चालक पत्नीने दोघा प्रियकरांच्या साथीने पतीच्या हत्या केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. कल्याण क्राईम ब्रांचने आरोपी महिलेसह तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. (Lady Rickshaw Driver kills Husband with two boyfriends in Kalyan)

दोघा प्रियकरांच्या साथीने महिलेचे कृत्य

प्रवीण पाटील या तरुणाच्या हत्या प्रकरणात कल्याण क्राईम ब्रांचने मोठी कारवाई केली. 17 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रवीणच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं. रिक्षा चालक पत्नीने दोघा प्रियकरांच्या साथीने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी पत्नीसह तिघे दोन प्रियकर कल्याण क्राईम ब्रांचच्या ताब्यात आहेत.

वसईत रिक्षाचालकाची हत्या

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी वसईतील रिक्षा चालकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी मनोर पोलिसांनी पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. वसई येथील रिक्षाचालक पुंडलिक पाटील यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे आरोपी पत्नी आणि प्रियकर हे दोघंही पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं उघड झालं होतं.

पत्नी-प्रियकरासह पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

विकास पष्टे आणि पुंडलिक पाटील याची पत्नी या दोघांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा दावा केला जातो. प्रेमात अडसर ठरणाऱ्या रिक्षाचालक पतीचा दोघांनी काटा काढला.

रिक्षातच रिक्षाचालकाचा मृतदेह

रिक्षाचालक पुंडलिक पाटील यांची 18 फेब्रुवारी रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर ढेकाळे परिसरात रिक्षामध्येच पुंडलिक पाटील यांचा मृतदेह आढळला होता. रिक्षातच चालकाचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मनोर पोलिसांनी तपास करत अवघ्या काही दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

संबंधित बातम्या :

लैंगिक संबंधांची मागणी धुडकावली, डोंबिवलीत दुकानदाराच्या पत्नीच्या हत्येचं गूढ उकललं

रिक्षाचालकाची हत्या, कॉन्स्टेबल पत्नीला अटक, पत्नीच्या पोलीस प्रियकरालाही बेड्या!

(Lady Rickshaw Driver kills Husband with two boyfriends in Kalyan)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI