AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET exam scam| जी. ए. सॉफ्टवेअरच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांना अटक ; तुपे व सावरीकर यांची 30 डिसेंबरापर्यत पोलीस कोठडी वाढवली

या गैरव्यवहारातून मिळवलेली रक्कम सुपे व सावरीकर यांनी जवळच्या नातलगांमध्ये दिल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. या तपासात तुपेंच्या दोन नातेवाईकांनी पुढे येत तुपेनी ठेवायला दिलेली 25 लाख रुपयांची रोकड पोलिसांकडे जमा केली आहे.

TET exam scam| जी. ए. सॉफ्टवेअरच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांना अटक ; तुपे व सावरीकर यांची 30  डिसेंबरापर्यत पोलीस कोठडी वाढवली
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 12:11 PM
Share

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहारातील तपासात नवनवीन माहिती दररोज  समोर येत आहे. गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम तुपे यांनी सहकारी आरोपीच्या मदतीने बनावट संकेतस्थळाची निर्मिती केल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. आरोपी तुकाराम तुपे व अभिषेक सावरीकर यांनी जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुखच्या मदतीने बनावट संकेतस्थळाची निर्मिती करत अपात्र विद्यार्थ्यांना पास असल्याचे  दाखवले आहे. इतकेच नव्हेतर यासाठी पैसेही घेतल्याची माहिती न्यायालयात दिली आहे. न्यायालयाने सुपे व सावरीकर या दोघांचीही पोलीस कस्टडी 30 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

पैसे परिचितांकडे दिले पैसे

या गैरव्यवहारातून मिळवलेली रक्कम सुपे व सावरीकर यांनी जवळच्या नातलगांमध्ये दिल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. या तपासात तुपेंच्या दोन नातेवाईकांनी पुढे येत तुपेनी ठेवायला दिलेली 25 लाख रुपयांची रोकड पोलिसांकडे जमा केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी तुपेकडून दोन कोटी 80 लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. तुपेच्या घरावर छापा टाकत सुरुवातीला 88 लाखांची रक्कम जप्त केली होती.  सुपे यांचे जावई नितीन पाटील व मुलगी कोमल पाटील यांच्याकडूनही 1 कोटी 59 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली होती.

जी.ए सॉफ्टवेअरच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी जी.ए सॉफ्टवेअर कंपनीच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांना चौकशी घेतलं ताब्यात घेतले आहे. या कर्मचाऱ्यांना शहरातील हिंजवडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवायतुकाराम तुपेच्या परिकगीत व्यक्तीकडून काही रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. जप्त करण्यात या आलेल्या रक्कमेचा पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.

या गैरव्यवहारात सुपे यांच्यासोबत आणखी काही एजंट, अकादमीचालकही कार्यरत होते का? याचा शोध पोलीस घेत आहेत. पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आलेल्या या गुन्ह्याचा तापासाठी पोलिसही वेगवान चक्र फिरवत आहेत. याबाबत आरोपीनकडेही तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी   दिली आहे.

Aurangabad Corona: एक शिक्षक पॉझिटिव्ह, नामांकित शाळा तीन दिवस बंद, विद्यार्थी, स्टाफचीही चाचणी!

Chandrakant Patil | पेपरफुटी प्रकरणात सीबीआय चौकशीची आमची मागणी : चंद्रकांत पाटील

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रतिबंध अधिक कडक, लसीकरण न झालेल्यांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मज्जाव

धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.