CCTV | म्हैस उधळून दुचाकीला धडकली, पुण्यात दाम्पत्य जखमी, तिघांना अटक

म्हैस अचानक उधळून तिने रस्त्यावरुन जाणाऱ्या दोन दुचाकींना थेट धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

CCTV | म्हैस उधळून दुचाकीला धडकली, पुण्यात दाम्पत्य जखमी, तिघांना अटक
पुण्यात म्हशीची दुचाकींना धडक
| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 10:16 AM

पुणे : अचानक उधळलेली म्हैस धडकल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी झाल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. म्हशीच्या मालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

म्हैस अचानक उधळून तिने रस्त्यावरुन जाणाऱ्या दोन दुचाकींना थेट धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाल्याची माहिती आहे. दुचाकी चालक जुबेर शेख हे पत्नीसोबत जात असताना वरशी मस्जिदजवळ ही घटना घडली. पुण्यातील कॅम्प परिसरात घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

दरम्यान, संबंधित म्हशीच्या मालकाविरोधात पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

सोलापुरात पुन्हा म्हशी पळविण्याचा कार्यक्रम, हजारो लोकांची गर्दी, कोरोना नियमांना हरताळ

VIDEO : ईदनिमित्ताने पाकिस्तानी पत्रकाराने घेतली चक्क म्हशीची मुलाखत, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल!