AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉम्ब ब्लॉस्ट करण्यापूर्वी 15 खतरनाक दहशतवादी NIA च्या ताब्यात?

NIA raids in pune, mumbai and Maharashtra: राष्ट्रीय तपास संस्थेने पुण्यातून अटक केलेल्या अतिरेक्यांच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळाली होती. त्यानंतर शनिवारी सकाळीच पुण्यासह ४१ ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी दहा खतरनाक दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

बॉम्ब ब्लॉस्ट करण्यापूर्वी 15 खतरनाक दहशतवादी NIA च्या ताब्यात?
terrorist
| Updated on: Dec 09, 2023 | 10:05 AM
Share

अभिजित पोते, पुणे | 9 डिसेंबर 2023 : राष्ट्रीय तपास संस्थेने देशभरात इसिस मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यासाठी छापे टाकले आहे. पुणे शहरासह मुंबई, ठाणे ग्रामीणमध्ये छापे टाकले. महाराष्ट्रातील ४१ ठिकाणी एनआयएकडून कारवाई सुरु आहे. यावेळी महाराष्ट्र एटीएस सोबत आहे. पुणे शहरातून उघड झालेल्या या प्रकरणात अटकसत्र सुरु आहे. १५ खतरनाक दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या अतिरेक्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

शनिवारी पहाटेच कारवाई

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शनिवारी पहाटेपासून मोठी छापेमारी केली. या छापेमारीत पंधरा खतरनाक दहशतवाद्यांना NIA आणि ATS ने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली. पुणे शहराबरोबर ठाण्याजवळील पडगासह राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. पकडलेले दहशतवादी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दहशतवाद्यांजवळ द्रव्य स्वरूपात बॉम्ब स्फोट करणारे साहित्य मिळाले.

काय आहे नेमके प्रकरण

इसिस मॉड्यूल हे पुण्यातून उघड झाले प्रकरण आहे. एका मोटारसायकल चोरी प्रकरणाचा शोध घेत असताना पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली. 18 जुलै रोजी पोलिसांनी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी यांना पकडले. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा फरार झाला. पोलिसांनी त्यांच्या घराची तपासणी केल्यानंतर धक्कादायक माहिती मिळाली. दहशतवादी कारवायांसाठी असणारी आक्षेपार्ह कागदपत्रे, बॉम्ब बनवण्याचे साहित्य मिळाले. त्यानंतर मोटारसायकल चोरी प्रकरणातील हे आरोपी दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले.

काय होता उद्देश

इसिसच्या नेटवर्कमध्ये हे पुण्यातील अतिरेकी सहभागी झाले होते. भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे उद्दीष्ट इसिसने त्यांना दिले होते. त्यासाठी युवकांचा शोध घेऊन त्यांचे ब्रेन वॉश करण्याचे काम हे करत होते. मागील महिन्यात एका अतिरेक्यास अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून देशाच्या सैनिक स्थळांवर हल्ल्याची योजना या अतिरेक्यांनी आखल्याची माहिती मिळाली.

कोंढवा आणि मोमीनपुरा परिसरात छापेमारी

कोंढवा तालाब फॅक्टरी इथे इसेन्शिया सोसयटीमध्ये शोएब अली शेख यांच्या घरी छापेमारी केली. यावेळी लॅपटॅाप आणि मोबाईल जप्त केले आहे. मोमीनपुरा गुलमोहर सोसायटीमध्ये अन्वर अली यांच्या घरी ही कारवाई केली. २०२३ मध्ये एनआयएने दाखल केलेल्या इसिस संबंधांतील केसमध्ये एटीएसच्या मदतीने ही छापेमारी केली.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.