Raided on Sukhdev Dere’s House|सुखदेव डेरेच्या संगमनेरमधील घराचीही पोलिसांनी घेतली झडती ; दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम हस्तगत

तब्बल तीन तास झडती घेण्याचे काम सुरु होते. या झडतीत पोलिसांनी दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम हस्तगत केली आहे. संगमनेर जवळील गुंजाळवाडी परिसरात डेरे यांचे "सुखयश निवास" स्थान आहे. यावेळी पोलिसांनी डेरे यांच्या कुटुंबियांचे जबाबही नोंदवले आहेत.

Raided on Sukhdev Dere's House|सुखदेव डेरेच्या संगमनेरमधील घराचीही पोलिसांनी घेतली झडती ; दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम हस्तगत
sukhadev dere
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 11:25 AM

पुणे – शिक्षका पात्रता भरती घोटाळ्यातील( TET Exam scam )आरोपी परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरेच्या ( sukhadev dere) घराची झडती पुणे पोलिसांनी घेतली आहे. पुणे सायबर सेलचे (pune  cyber cell)  सहाय्यक पोलिस निरीक्षक कादीर देशमुख यांच्या पथकाने ही झडती घेतली. तब्बल तीन तास झडती घेण्याचे काम सुरु होते. या झडतीत पोलिसांनी दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम हस्तगत केली आहे. संगमनेर जवळील गुंजाळवाडी परिसरात डेरे यांचे “सुखयश निवास” स्थान आहे. यावेळी पोलिसांनी डेरे यांच्या कुटुंबियांचे जबाबही नोंदवले आहेत.

सुखदेव डेरेंची वादग्रस्त कारकीर्द सुरुवातीपासूनच सुखदेव डेरे यांची कारकीर्द ही गैरव्यवहारांनी व वादांनी बरबटलेली आहे. डेरे यांनी औरंगाबाद येथे शिक्षण उपसंचालक म्हणून दोन वर्षे काम केले. त्यांच्याकडे विभागीय शिक्षण मंडळात अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभारदेखील होता. 4 डिसेंबर 2012 ते 16 जानेवारी 2014 अशी दोन वर्षे ते औरंगाबादेत होते. शिक्षण उपसंचालक पदावर असताना संस्थाचालकांच्या दबावात नियमबाह्यमपणे अनेक शिक्षकांच्या पदाला मान्यता दिल्याचा आरोप डेरेंवर झालेला होता. तसेच अनेक शिक्षक संघटनांनी अनेक आंदोलने करून डेरेंनी केलेली नियमबाह्य नियुक्त्यांची प्रकरणे उघड केली होती.

2018 च्या टीईटी घोटाळा शिक्षक संघटना समन्वय समितीमार्फत त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथील शिक्षण संचालक आणि मंडळाचे मुख्यलय असेलले राज्य परीक्षा मंडळाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, डेरे यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी झाली. त्यात त्यांनी निर्दोष असल्याचे सिद्ध केले. राज्य सरकारने त्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत पदोन्नती देऊन रुजू करून घेतले होते. आता शिक्षक पात्रता परीक्षेत 2018 गैरव्यवहार करून कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून ते सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत.

पुणे पोलिसांचा छापेमारीचा धडाका सुरूच

टीईटी घोटाळ्यातील अटक केलेल्या आरोपींच्या घरी छापा टाकण्याचा धडाका पुणे पोलिसांनी सुरु ठेवला आहे परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपेच्या घरी पोलिसांनी आतापर्यंत तीनवेळा धाड टाकली. यामध्ये जवळपास 4  कोटीपर्यंतची रक्कम हस्तगत केली आहे. याबरोबर जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार यालाही बंगळूरमधून पोलिसांनी अटक केली. त्याच्या घरावरही छापा टाकत झडती घेतली यात अश्विन कुमारच्या घरातून 14 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे पोलिसांनी जप्त केले आहे.

TET Exam: मला टार्गेट केलं जातंय, यामुळे आत्महत्या करावीशी वाटतेय, तुकाराम सुपेचा इशारा!

VIDEO : Ajit Pawar | TET घोटाळ्याचा तपास योग्यरित्या सुरू, अजित पवारांकडून पुणे आयुक्तांची पाठराखण

TET exam Scam : पुणे पोलिसांचा धडाका सुरुच, आश्विन कुमारच्या घरातून 2 किलो सोनं, 24 किलो चांदी जप्त

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.