Pune Police : पुणे पोलिसांची ‘दादागिरी’ पाठोपाठ ‘ताईगिरी’; महिला कर्मचारीने हमालाचा हात पिळला, शिवीगाळही केली

पुणे शहरातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या पदाचे कुठलेच भान न ठेवत अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ करीत नागरिकांना बंद खोलीत बेदम मारहाण केली.

Pune Police : पुणे पोलिसांची 'दादागिरी' पाठोपाठ 'ताईगिरी'; महिला कर्मचारीने हमालाचा हात पिळला, शिवीगाळही केली
पंजाबमध्ये स्कूल बसवर तलवारीने हल्ला
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 5:59 PM

पुणे : खाकी वर्दी म्हणजे कायद्याची रक्षक. पण याच खाकीकडून जेव्हा कायदा धाब्यावर बसवून निष्पाप, निरपराध्यांना टार्गेट केले जाते, तेव्हा लोकांचा खाकी वर्दीवरचा विश्वास उडतो. पुणे जिल्ह्यात सध्या याचाच प्रत्यय येत आहे. पुणे शहरातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या पदाचे कुठलेच भान न ठेवत अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ (Abuse) करीत नागरिकांना बंद खोलीत बेदम मारहाण (Beating) केली. त्या शिवीगाळ आणि मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Viral) झाला असतानाच आता एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा प्रताप समोर आला आहे. या महिला पोलीस कर्मचाऱ्याने हमालाचा हात मुरगळला तसेच त्याला मारहाण करून शिवीगाळही केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. रस्त्यात टेम्पो लावल्याच्या किरकोळ कारणावरून महिला पोलीस कर्मचाऱ्याचा तोल ढळल्याने तिच्या कृत्यावर संताप व्यक्त होत आहे. तसेच तिच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

शुल्लक कारणावरून हमालाला हात मोडण्याची धमकी

लोणी काळभोर परिसरात बुधवारी सायंकाळी ही खळबळजनक घटना घडल्याने पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ समोर आला होता. त्यापाठोपाठ ही घटना घडली आहे. त्यामुळे पुणे पोलीस टीकेच्या केंद्रस्थानी सापडले आहेत. लोणी काळभोर परिसरातील उरुळी कांचन येथील महिला पोलीस कर्मचाऱ्याने हमालाला बेदम मारहाण केली. अगदी शुल्लक कारणावरून तिने हमालाला त्याचा हात मोडून टाकण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता तिने त्याचा हात जोराने पिळला. त्यामुळे हमालाला जीवघेण्या वेदनाही झाल्या. किशोर निवृत्ती गरड असे मारहाण झालेल्या हमालाचे नाव असून त्याला न्याय मिळवून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. त्याला भारती होले नावाच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण आणि शिवीगाळ केली असून ती सध्या उरुळी कांचन येथील पोलीस चौकीत कार्यरत आहे.

रस्त्यात टेम्पो उभा केल्याबद्दल माफी मागितली, पण तरीही…..

मारहाणीची घटना घडली, त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी हमालाच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिंदवणे गावाच्या रस्त्यावरील एका किराणा मालाच्या दुकानात गरड टेम्पोतील माल उतरवित होते. त्याचवेळी भारती तेथे आल्या आणि त्यांनी गरड यांचे काहीही म्हणणे ऐकून न घेता त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. रस्त्यात टेम्पो उभा केल्याबद्दल गरड यांनी माफी देखील मागितली. मात्र भारती यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत गरड यांना मारहाण सुरू ठेवली, असे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे. या मारहाणीची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर धायगुडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अधिक माहिती घेऊन पुढील कारवाई करू, असे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले. या घटनेने पुणे पोलिसांच्या ‘दादागिरी’पाठोपाठ ‘ताईगिरी’ चव्हाट्यावर आणल्याने ‘खाकी वर्दी’ विरोधात संतापाची लाट उसळली आहे. (Porter abused and beaten by women police in Pune, video viral on social media)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.