AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chennai Gold Loot : सुरक्षारक्षकाला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध दिले, मग चाकूचा धाक दाखवून गोल्ड लोन कंपनीतील सोने लुटले, वाचा चेन्नईत नेमके काय घडले ?

लुटण्यात आलेल्या सोन्याची किंमत 16 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून पोलिसांनी 18 किलो सोने जप्त केले आहे.

Chennai Gold Loot : सुरक्षारक्षकाला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध दिले, मग चाकूचा धाक दाखवून गोल्ड लोन कंपनीतील सोने लुटले, वाचा चेन्नईत नेमके काय घडले ?
वाशीतील बस स्टॉपवर महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंगImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 15, 2022 | 5:07 PM
Share

चेन्नई : सुरक्षारक्षकाला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देत मग गोल्ड लोन कंपनीतील कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून 32 किलो सोने लुटल्या (Gold Loot)ची घटना चेन्नईत उघडकीस आली आहे. चेन्नईच्या अरुम्बक्कम येथील फेडबँक फास्ट गोल्ड लोन (Fedbank Fast Gold Loan)च्या कार्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. यामध्ये एक आरोपी दुचाकीवर काळे कपडे घातलेला दिसत आहे. विशेष म्हणजे कंपनीतील माजी कर्मचारीच या दरोड्याचा मुख्य सूत्रधार आहे. मुरुगन असे या आरोपी कर्मचाऱ्याचे नाव आहे. लुटण्यात आलेल्या सोन्याची किंमत 16 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक (Arrest) केली असून, त्यांच्याकडून पोलिसांनी 18 किलो सोने जप्त केले आहे. बालाजी (30) आणि संतोष (28) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दरोड्यातील मुख्य आरोपी गोल्ड कंपनीचा माजी कर्मचारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेडबँक फास्ट गोल्ड शाखेचा माजी कर्मचारी असलेल्या मुरुगनचा या घटनेत सहभाग होता. मुरुगनने यापूर्वीही येथे काम केले होते. त्याने कोल्ड्रिंक्स आणले होते. त्याने सुरक्षारक्षकाने थोडं थांबायला सांगितलं आणि आणखी कोल्ड्रिंक्स मागवले. सुरक्षारक्षक कोल्ड्रिंक घेऊन परत आला तेव्हा त्याने त्यालाही कोल्ड्रिंक्स ऑफर केले. सुरक्षारक्षकाने कोल्ड्रिंक्स पिण्यास नकार दर्शवला. मात्र मुरुगनने त्याला खूप विनंती करुन कोल्ड्रिंक्स प्यायला दिले. त्यामुळे सुरक्षारक्षकाने थोडे कोल्ड्रिंक्स प्यायले. कोल्ड्रिंक्स प्यायल्यानंतर सुरक्षारक्षकाला चक्कर येऊ लागली, अशी माहिती सुरक्षारक्षक सरवणन याने दिली.

कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून सोने लुटले

सुरक्षारक्षकाला गुंगी आल्यानंतर मुरुगनच्या नेतृत्वाखाली तिघांनी कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवला. दोन कर्मचाऱ्यांना बांधून वॉशरूममध्ये सोडले आणि त्यानंतर हा दरोडा टाकला. या दरोड्यानंतर पोलिसांनी आरोपींवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत 24 तासांत या घटनेतील दोन आरोपींना विल्लीवक्कम येथून अटक केली असून, 18 किलो सोन्यासह दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच मुख्य आरोपीलाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. (32 kg of gold looted from Fedbank Fast Gold Loan Company by giving drug to security guard in Chennai)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.