AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Mete : विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूच्या तपासाला वेग; पोलिसांना गुप्तता बाळगण्याचे वरिष्ठांचे आदेश

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ प्रशासनाने तपासात ठोस माहिती हाती लागेपर्यंत तपासातील कुठल्याही बाबी उघड न करण्याबाबत स्थानिक पोलिसांना निर्देश दिल्याचे सूत्रांकडून समजते.

Vinayak Mete : विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूच्या तपासाला वेग; पोलिसांना गुप्तता बाळगण्याचे वरिष्ठांचे आदेश
विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूच्या तपासाला वेगImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 15, 2022 | 4:20 PM
Share

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यू (Accidental Death) प्रकरणाच्या तपासाला रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलिसांनी गती दिली आहे. मेटेंच्या अपघाताला नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत ठरली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनेचा सर्व अंगांनी तपास (Investigation) सुरु केला आहे. त्याच अनुषंगाने आवश्यक ते सर्व पुरावे गोळा केले जात आहेत. मात्र, पोलिसांना सध्या सुरु असलेल्या तपासाबाबत गुप्तता बाळगण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ प्रशासनाने तपासात ठोस माहिती हाती लागेपर्यंत तपासातील कुठल्याही बाबी उघड न करण्याबाबत स्थानिक पोलिसांना निर्देश दिल्याचे सूत्रांकडून समजते.

प्रत्यक्षदर्शींच्या जबाबासह सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने अधिक तपास

विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाला. मात्र त्यांच्या गाडीला धडक बसल्यानंतर पुढील काही काळ त्यांना वैद्यकीय मदत का मिळाली नाही? यावरून संशयाचे वादळ उठले आहे. त्याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी चहुबाजुंनी विविध अंगांनी तपास सुरु ठेवला आहे. रायगड जिल्ह्यातील घटनास्थळासह मेटे यांच्या गाडीला धडक देणाऱ्या ट्रकने धूम ठोकलेल्या पालघर जिल्ह्यापर्यंत तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत. याचदरम्यान अपघात कि घातपात? याचे नेमके उत्तर देणारे ठोस धागेदोरे शोधले जात असून त्यासंदर्भातील पुरावे जमा केले जात आहेत. या प्रकरणात मागील 24 तासांत रसायनी पोलिसांनी अपघात झालेल्या गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट (न्यायवैद्यक अहवाल), अपघात घडला त्यावेळी तेथे हजर असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब, अपघात घडला त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज, मेटेंच्या गाडीचा ड्रायव्हर एकनाथ कदमचा जबाब तसेच वैद्यकीय अहवाल, मेटेंच्या गाडीला धडक देऊन पसार झालेल्या ट्रक ड्रायव्हरचा जबाब, ट्रकच्या क्लिनरचा जबाब, सगळ्यांचे टॉवर लोकेशन आणि इतर बाबी गोळा केल्या आहेत. या सर्व गोष्टी पुरावे म्हणून विचारात घेतल्या जाणार आहेत. याच पुराव्यांतून मेटेंच्या अपघातामागील नेमक्या कारणाचा आणि चूक कोणाची होती, याचा उलगडा होणार आहे.

प्रकरणाबाबत पोलिसांकडून गुप्तता; ट्रक व चालक रायगड पोलिसांच्या ताब्यात

विनायक मेटे हे शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख नेते होते. तसेच मागील काही वर्षांत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने वेळोवेळी आंदोलने केली. या अनुषंगाने पोलिसांना प्रकरणाबाबत गुप्तता बाळगून सखोल तपास करण्याचे निर्देश वरिष्ठ प्रशासनाकडून देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. त्याला अनुसरून रायगड आणि पालघर जिल्ह्यातील पोलिसांकडून तपास सुरु आहे. मेटेंच्या गाडीचा ड्रायव्हर एकनाथ कदम एमजीएम हॉस्पिटलमध्येच उपचार घेत आहे. त्याला डिस्चार्ज देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मेटेंच्या गाडीला धडक देऊन वापीच्या दिशेने पलायन केलेला, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे पालघरला पकडलेला ट्रक आणि ड्रायव्हर सध्या रायगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. (Investigation into Vinayak Mete accidental death speeded up, superiors order police to maintain secrecy)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.