Dream 11 | ‘पीएसआय’ करोडपती झाला अन् चर्चेत आला, परंतु आता…

Pune Dream 11 | पुणे येथील पीएसआय चर्चेत आले आहेत. कारण हे पोलीस उपनिरीक्षक करोडपती झाले आहेत. यासंदर्भात माहिती समोर आली. त्यानंतर मात्र पोलीस उपनिरीक्षक असलेले सोमनाथ झेंडे यांची अडचण वाढली आहे. कारण...

Dream 11 | 'पीएसआय' करोडपती झाला अन् चर्चेत आला, परंतु आता...
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 8:10 AM

रणजित जाधव, पुणे | 12 ऑक्टोंबर 2023 : सरकारी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चर्चा अधूनमधून होत असते. मग कधी उत्पन्नापेक्षा अधिक संपती मिळालेल्या सरकारी अधिकाऱ्यांवर छापे पडतात. त्यांच्या संपतीची माहिती त्यानंतर बाहेर येत असते. आता सरकारी अधिकारी असलेल्या व्यक्तीचे वेगळेच प्रकरण समोर आले आहे. पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक असलेले सोमनाथ झेंडे हे करोडपती झाले आहे. ते कोरडपती वेगळ्याच माध्यमातून झाले आहे. परंतु आता त्यांच्यासमोर अडचण वाढणार आहे. त्यांची चौकशी करण्याचा निर्णय झाला आहे.

कसा मिळाला त्यांना पैसा

पोलीस उपनिरीक्षक असलेले सोमनाथ झेंडे हे क्रिकेट चाहते आहेत. सध्या सर्वत्र विश्वचषकाचा फिवर असल्यामुळे त्यांना क्रिकेटचे फिवर आले आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वीपासून झेंडे यांना ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. झेंडे यांनी वर्ल्डकपमधील खेळाडूंचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी ड्रीम इलेव्हनवर टीम तयार केली. नुकताच झालेल्या बांगलादेश विरुद्ध इंग्लंड त्यांच्या ड्रीम इलेव्हनची टीम अव्वल आली. त्यातून सोमनाथ झेंडे यांना दीड कोटी रुपये मिळाले.

आता झाली त्यांची अडचण

ड्रीम 11 मधून करोडपती झालेल्या पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांची चौकशी होणार आहे. बक्षिसाच्या दीड कोटींमुळे आता झेंडे यांना खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. कारण ऑनलाईन गेमिंगमध्ये तरुणाई भरकटत चालली आहे. या गेमिंगमधून अनेकांची फसवणूक होते. त्यावेळी पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम 11 खेळण्याचा मोह झाला.

हे सुद्धा वाचा

डिसीपी करणार चौकशी

पीएसआय सोमनाथ झेंडे यांची आता डिसीपीकडून चौकशी करण्यात येणार आहे. प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी यामध्ये तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आता या चौकशीत त्यांच्यावर काही कारवाई होते की हा केवळ कारवाईचा फार्स ठरतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. परंतु आता सोमनाथ झेंडे यांच्या करोडपती होण्याची चर्चा सुरु आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.