AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Accident : अपघात सत्र थांबेना! शिवशाही बस आणि कंटेनरची जोरदार धडक

Saswad Accident : एका गोडाऊनमधून कंटेनर निघाला. तो सासवड रस्त्यावर येत होता. नेमक्या याच वेळी भरधाव शिवशाही आली आणि तिनं कंटेनरचा जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांना जबर फटका बसला.

Pune Accident : अपघात सत्र थांबेना! शिवशाही बस आणि कंटेनरची जोरदार धडक
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 19, 2022 | 7:18 AM
Share

पुणे : राज्यातील रस्ते (Road Accident) अपघातांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीय. रविवारी मध्यरात्री उरुळी देवाची हद्दीतील सासवड (Saswad Pune) इथं भीषण अपघात झाला. एका कंटेनर आणि शिवशाही बसमध्ये (Pune Shivshahi bus accident) जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये एक जण ठार झाला असून पाच ते सहा जण जखमी झालेत.

मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एका प्रवाशाचा जागच्या जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. तर पाच ते सहा प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले असल्याची माहिती मिळतेय. सध्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नेमका कसा झाला अपघात?

पुणे सासवड रोड वर उरुळी देवाची फाट्याजवळ ही भीषण दुर्घटना घडली. उरुळी देवाची फाट्याजवळ असलेल्या एका गोडाऊनमधून कंटेनर निघाला होता. तो सासवड रस्त्यावर येत होता. नेमक्या याच वेळी पुण्याच्या दिशेने येत असलेल्या एका शिवशाही बसच्या चालकाला वेग नियंत्रित करता आला नाही. अखेर रस्त्यावर आडव्या दिशेत असलेल्या कंटेनरला भरधाव शिवशाही बसने जोरदार धडक दिली.

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

पंढरपूरहून प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेनं जात असताना शिवशाही बसचा अपघात झाला. भरधाव शिवशाही बसची ही धडक इतकी भीषण होती, की चालकासह प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. यात कंटनेरचंही नुकसान झालं, तर शिवशाही एसटी बसलाही फटका बसला. शिवशाही बस आणि कंटेनरच्या या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्य करण्यात आलं.

अपघातामुळे वाहतुकीची कोंडी

पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. तर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त शिवशाही बसला रस्त्यावरुन बाजूला हटवण्यात आलं. दरम्यान, या अपघातामुळे उरुळी देवाची फाट्याजवळ वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर अपघातग्रस्त बस हटवल्यानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.