AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“तुझे करिअर बनवेल, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा”, दहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार

Pune Crime News | सन 2022 मध्ये शेख याने फ्लॅटमध्ये पीडित मुलीला बोलावून घेतले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने प्रतिकार करत स्वतःची सुटका केली. त्यानंतर आरोपी मुलीला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला.

तुझे करिअर बनवेल, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा, दहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 03, 2024 | 9:01 AM
Share

रणजित जाधव, पिंपरी चिंचवड, पुणे, दि.3 फेब्रुवारी 2024 | पुणे शहरात अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. “तुझे करिअर बनवेल, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा”, ‘तुझ्या घरच्यांना फोन करून तुझे येथील मुलांबरोबर संबंध असल्याचे सांगेन”, असे सांगून निवासी अकॅडमीमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी संचालकासह एका माजी विद्यार्थिनीस अटक झाली. क्रिएटिव्ह अकॅडमीचे संचालक नौशाद शेख असे आरोपीचे नाव आहे.

कसा घडला प्रकार

पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर या ठिकाणी आरोपी नौशाद अहमद शेख क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमी अशी निवासी शाळा चालवतो. या निवासी शाळेत 2021 मध्ये पीडित मुलीने प्रवेश घेतला होता. त्यासाठी 2 लाख 26 हजार रुपये देखील भरले होते. प्रवेश झाल्यानंतर पीडित मुलगी क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीच्या हॉस्टेलमध्ये राहू लागली. तसेच या हॉस्टेलच्या पहिल्या मजल्यावर नौशाद शेख राहत होता.”तुझे करिअर बनवेल, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये रहा” असे म्हणत नौशाद शेख याने विद्यार्थिनीवर दाबाव आणला. त्यानंतर ती तयार झाली नाही. यामुळे लैंगिक अत्याचार केले ‘तुझ्या घरच्यांना फोन करून तुझे येथील मुलांबरोबर संबंध असल्याचे सांगेन” असे धमकावू लागला.

विनयभंग केला अन्…

सन 2022 मध्ये शेख याने फ्लॅटमध्ये पीडित मुलीला बोलावून घेतले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने प्रतिकार करत स्वतःची सुटका केली. त्यानंतर आरोपी मुलीला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला. नोव्हेंबर 2022 मध्ये देखील दिवाळीच्या सुट्टीमध्ये आरोपी शेख याने पीडित मुलीला तुला उटणे लावून अंघोळ घालून देतो, असे म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच, पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपी मुलीसमोर आरोपीने पीडित मुलीबाबत अश्लील शेरेबाजी केली. त्यानंतर मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपी तरुणीनीने पीडित मुलीला शेख याच्याबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे

माजी विद्यार्थिनीचा सहभाग

पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकाला अटक केली आहे. या प्रकरणात अकॅडमीच्या एका माजी विद्यार्थिनीला देखील अटक केली आहे. तिचाही या प्रकरणात सहभाग होता.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच