AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goldman | 20 बॉडीगार्डच्या गराड्यात राहायचे गोल्डमॅन दत्ता फुगे, पुण्यात दगडाने ठेचून झाली होती हत्या

1.27 कोटी रुपयांची किंमत असलेला जवळपास सव्वातीन किलो वजनाच्या सोन्याचा शर्ट परिधान केल्याने दत्ता फुगे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर तेजपाल रांका यांनी अनेक दिवसांच्या मोठ्या मेहनतीनंतर हा शर्ट तयार केला होता.

Goldman | 20 बॉडीगार्डच्या गराड्यात राहायचे गोल्डमॅन दत्ता फुगे, पुण्यात दगडाने ठेचून झाली होती हत्या
पुण्यातील हत्या झालेले गोल्डमॅन दत्ता फुगे
| Edited By: | Updated on: Jul 29, 2021 | 9:28 AM
Share

पुणे : जवळपास सव्वातीन किलो वजनाच्या सोन्याचा शर्ट विकत घेतल्याने जगभरात प्रसिद्ध झालेले पुण्याचे व्यावसायिक, गोल्डमॅन नावाने परिचित दत्तात्रय फुगे उर्फ दत्ता फुगे (Pune Gold Man Datta Phuge) यांची हत्या करण्यात आली होती. पुण्यात दिघी येथील भारतमाता नगर परिसरात 15 जुलै 2016 रोजी रात्री उशिरा दगडाने ठेचून फुगेंची हत्या करण्यात आली होती. जवळपास 20 बॉडीगार्डच्या गराड्यात राहणारे फुगे त्यावेळी एकटेच होते. दत्ता फुगेंचा मुलगा शुभम याने वडिलांच्या मारेकऱ्यांना पाहिलं होतं. या प्रकरणात पाच जणांना अटक झाली होती.

काय घडलं त्या रात्री?

दत्ता फुगे यांचा मुलगा शुभमच या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार राहिला. “अतुल मोहिते नावाच्या व्यक्तीने रात्री दहा वाजता फोन केला. मित्राच्या वाढदिवसासाठी वडिलांना घेऊन दिघीला येण्यास त्याने सांगितलं” असा जबाब शुभमने पोलिसांना दिला होता. वडिलांचा फोन बंद असल्याने शुभमने आईला निरोप दिला. त्यानंतर दत्ता फुगेंनी शुभमशी संपर्क साधला आणि 8 चिकन बिर्याणी, 2 व्हेज बिर्याणी आणि सिगरेटची दोन पाकिटं घेऊन मोहितेकडे येण्यास सांगितलं.

शुभमने हत्या होताना गाडीतून पाहिलं

शुभम सामान घेऊन दिघीला पोहोचला, तेव्हा अतुल मोहिते मोठ्या दगडाने दत्ता फुगे यांच्या डोक्यावर वार करत होता. त्याच्या साथीला आणखी 12 जण होते. हे पाहून शुभने कारमधून न उतरता आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्याने तातडीने 100 नंबरवर फोन करुन पोलिसांना सूचना दिली. या काळात सर्व आरोपी पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दत्ता फुगेंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि पुढील तपास सुरु केला.

हत्येनंतर एक किलोची सोन्याची चेन लंपास

दत्ता फुगे हे मनी वक्रतुंड नावाने चिटफंड चालवत होते. पत्नी आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सीमा फुगे यांच्यासोबत ते हा व्यवसाय करत होते. त्यांनी शेकडो जणांचे कोट्यवधी रुपये या चिटफंड कंपनीमध्ये गुंतवले होते. हत्येनंतर आरोपींनी त्यांच्या गळ्यातील एक किलो वजनाची सोन्याची चेन आणि त्यांचा मोबाईल घेऊन पोबारा केला होता. शुभमने आरोपींची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना लगेच अटक केली होती, तर अतुल मोहिते फरार होता.

पैशांचा तगादा लावल्याने हत्येचा कट

शुभमच्या माहितीनुसार आरोपी विशाल परखे आणि बाळा वळके यांनी दत्ता फुगेंकडून दीड लाखांचं कर्ज घेतलं होतं. फुगे दोघांकडून काही दिवसांपासून पैसे मागत होते. परखे आणि वळके हे दोघंही हिस्ट्रीशीटर आहेत. सारखा पैशांचा तगादा लावल्याने दोघांनी दत्ता फुगेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. अतुल मोहितेनेही तीन लाखांचं कर्ज घेतल्याचं तपासादरम्यान समोर आलं होतं.

फुगेंवर आरोप-प्रत्यारोप

दरम्यान, काही जणांनी दत्ता फुगेंवरही पैसे लाटल्याचाही आरोप केला होता. भोसरी पोलिसात त्यांच्यावर आर्थिक फसवणूक आणि धमकी दिल्याचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे पोलिसांनी फुगेंना तडीपार होण्याची नोटीसही जारी केली होती. तर पोलिसांनी मारहाण करुन आपल्याला जबरदस्ती या प्रकरणात अडकवल्याचा दावा फुगेंनी केला होता.

सव्वातीन किलो वजनाच्या सोन्याचा शर्ट

1.27 कोटी रुपयांची किंमत असलेला जवळपास सव्वातीन किलो वजनाच्या सोन्याचा शर्ट परिधान केल्याने दत्ता फुगे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर तेजपाल रांका यांनी अनेक दिवसांच्या मोठ्या मेहनतीनंतर हा शर्ट तयार केला होता. चार बंदुकधारी व्यक्तींच्या कडेकोट सुरक्षेत हा शर्ट विणण्यात आला होता. त्यासाठी 50 वर्ष जुना साचा वापरण्यात आला होता. 16 कारागीर 15 दिवस सातत्याने काम करत होते. सर्वात महागडा शर्ट घालण्याचा विक्रम गिनीज बूकमध्ये त्यांच्या नावे नोंदवण्यात आला होता. त्यामुळे जगभरातील माध्यमांनी त्यांची दखल घेतली होती. दत्ता फुगे जेव्हा हा सोन्याचा शर्ट घालून बाहेर पडत असत, तेव्हा 20 बॉडीगार्ड्सचा पहारा त्यांच्याभोवती असे. मात्र त्यांना एकट्याने गाठून आरोपींनी डाव साधला होता.

संबंधित बातम्या :

पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणातील आरोपीसह तिघांकडून तीन पिस्तुल जप्त

गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या मुलाला कानाखाली मारल्याचा राग, पुण्यात तरुणाची हत्या

(Pune Crime Pimpri Chinchwad Read full story about Gold Man Datta Fuge Murder Case)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.