गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या मुलाला कानाखाली मारल्याचा राग, पुण्यात तरुणाची हत्या

सोन्याचा शर्ट परिधान करत असल्यामुळे चर्चेत आलेल्या दत्ता फुगे यांची 15 जुलै 2016 रोजी हत्या करण्यात आली होती. आता अमन सुरेश डांगळे याच्या हत्या प्रकरणात दत्ता फुगेचा मुलगा शुभमला अटक झाली आहे

गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या मुलाला कानाखाली मारल्याचा राग, पुण्यात तरुणाची हत्या
आरोपी शुभम दत्ता फुगे
रणजीत जाधव

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 28, 2021 | 4:00 PM

पिंपरी चिंचवड : “आमच्या भाईला कानाखाली का मारली?” असा सवाल करत तिघांनी आपल्याच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मयत गोल्डमॅन दत्ता फुगे (Datta Phuge) यांचा मुलगा शुभमला कानाखाली मारल्यावरुन चौघा मित्रांमध्ये वाद झाला होता. हत्ये प्रकरणी शुभम दत्ता फुगे याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड मधील भोसरी परिसरात हा प्रकार घडला.

काय आहे प्रकरण?

सोन्याचा शर्ट घेतल्याने चर्चेत आलेले आणि काही वर्षांपूर्वी हत्या झालेला गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या मुलाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. भोसरी परिसरात दोन दिवसांपूर्वी पहाटे अमन सुरेश डांगळे याचा मृतदेह मिळाला होता. हा हत्येचा तपास सुरु असताना पोलिसांनी शुभम फुगे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली.

नेमकं काय घडलं?

मयत अमन आणि तिन्ही आरोपी मित्र होते. दारु पित असताना अमन डांगळे आणि शुभम फुगे यांच्यात वाद झाला. त्यानंतर अमनने शुभमच्या कानाखाली मारली. त्याचा राग आल्याने शुभम आणि त्याच्या दोन साथीदारांनी अमनची हत्या केली. आमच्या भाईला कानाखाली का मारली? असा सवाल करत तिघांनी अमनची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या तिघांवर आधीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

जुलै 2016 मध्ये फुगेची हत्या

सोन्याचा शर्ट परिधान करत असल्यामुळे चर्चेत आलेल्या दत्ता फुगे यांची 15 जुलै 2016 रोजी हत्या करण्यात आली होती. पुण्यात दिघी येथील भारतमाता नगर परिसरात हा प्रकार घडला होता. पद्धतशीरपणे कट रचून फुगे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांचा मुलगा शुभमने केला होता. शुभमच या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदारही आहे. दत्ता यांची पत्नी सीमा फुगे या माजी नगरसेविका आहेत.

सोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे प्रसिद्ध

अंगावर सोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे दत्ता फुगे पिंपरीचे गोल्डमॅन म्हणून ओळखले जात होते. सुमारे साडेतीन किलो सोन्याचा शर्ट बनवून विश्वविक्रम नोंदवल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते.

संबंधित बातम्या :

पुण्यात नवा गोल्डमॅन, सोन्याचे दागिने सोडा, चप्पल आणि बूटही सोन्याचा!

पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणातील आरोपीसह तिघांकडून तीन पिस्तुल जप्त

(Pune Crime Pimpri Chinchwad Gold Man Datta Fuge Son Shubham Fuge arrested in Murder Case)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें