AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Accident : जुन्नरमध्ये भीषण अपघात! एसटी बस आणि इको कारची समोरासमोरच जोरदार धडक, 1 ठार

Junnar Accident News : एसटी बस आणि इको कार यांच्यात समोरसमोरच भीषण धडक झाली.

Pune Accident : जुन्नरमध्ये भीषण अपघात! एसटी बस आणि इको कारची समोरासमोरच जोरदार धडक, 1 ठार
भीषण अपघात...Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 9:46 AM
Share

पुणे : नगर कल्याण (Nagar-Kalyan Highway) महागमार्गावर भीषण अपघात झाला. एसटी बस आणि इको कार यांच्या झालेल्या भीषण अपघातात (Pune Junnar Accident news) एकाचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. एसटी बस (ST Bus) आणि इको कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. तर एसही बसही अपघातानंतर थेट शिवारात घुसल्याचं पाहायला मिळालं. या अपघातानंतर अहमदनगर-कल्याण महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. रात्री झालेल्या अपघातामुळे बचावकार्य करतानाही अडथळा येत होता. दरम्यान, स्थानिकांनी तातडीनं अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेतली आणि मदतकार्य केलं आहे. एका 48 वर्षांच्या महिलेचा या अपघातामध्ये जीव गेला आहे.

…आणि बस थेट शिवारात घुसली

नगर-कल्याण महामार्गावर जु्न्नर तालुक्यात एसटी बसचा अपघात झाला. एसटी बस आणि इको कार यांच्यात समोरसमोरच भीषण धडक झाली. जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील शिवारात एसटी बस घुसली होती. तर रस्त्यावरच इको कारचा चक्काचूर झाला होता. या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. बसमधील प्रवाशांचीही या अपघातात घाबरगुंडी उडाली होती. गुलशन शकील चौगुले असं या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या 48 वर्षीय महिलेचं नाव आहे. या महिलेच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चौघेजण गंभीर जखमी

या अपघातामध्ये चार जण थोडक्यात बचावले असले, तरी गंभीररीत्या जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नेमका हा अपघातात चूक कुणाची होती, हे कळू शकलेलं नाही. मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. इको कार आणि एसटी बस यांच्या धडक झाल्यानंतर ही बस थेट शिवारात घुसली होती.

पावसात गाडी चालवताना काळजी घ्या

सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा जोर कायम आहे. अशातच पावसात दृश्यमानता कमी होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनं हाकतात अधिक सतर्कता बाळगावी आणि पावसात वाहनं वेगानं हाकू नयेत, असं आवाहन करण्यात येतंय.

शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.