AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालकांनो मुलांना सांभाळा, पाहा शाळेत खेळताना मुलगा पडला अन् नको ते घडले

Pune Accident News | शाळेत गेल्यावर धोकादायक पद्धतीने खेळू लागला. मित्रांनी त्याला असे खेळू नको, सांगितले. परंतु त्याने ऐकले नाही अन् नको ते घडले. यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना सावधगिरीने आणि चांगले खेळ शिकवणे गरजेचे झाले आहे.

पालकांनो मुलांना सांभाळा, पाहा शाळेत खेळताना मुलगा पडला अन् नको ते घडले
| Updated on: Feb 16, 2024 | 2:50 PM
Share

रणजित जाधव, पिंपरी-चिंचवड, पुणे, दि. 16 फेब्रुवारी 2024 | पिंपरी चिंचवडमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. अकरा वर्षांचा मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. शाळेत गेल्यावर धोकादायक पद्धतीने खेळू लागला. मित्रांनी त्याला असे खेळू नको, सांगितले. परंतु त्याने ऐकले नाही अन् नको ते घडले. यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना सावधगिरीने आणि चांगले खेळ शिकवणे गरजेचे झाले आहे. पुणे शहरातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून सार्थक कांबळे या आठवीतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय.

कसा घडला प्रकार

पिंपरी चिंचवडमधील काळेवाडीत राहणारा सार्थक कांबळे हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात होता. बाराच्या सुमारास तो तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर खेळत होता. पण रेलिंगवर घसरगुंडी खेळणे धोकादायक होते. त्याला याची कल्पना एका मित्राने दिली. तू येथे खेळू नकोस, खाली पडशील, तुला लागेल, असे म्हणत त्याला रेलिंगवरून खाली उतरण्याचा सल्ला दिला. मात्र सार्थक कांबळे त्याने तो ऐकला नाही. तो त्याच्याच धुंदीत होता. यावेळी अचानकपणे त्याचा तोल गेला अन तो थेट तळ मजल्याच्या डक्टमध्ये पडला. सार्थक कांबळे हा शाळेत जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळत होता

रुग्णालायत नेले पण…

सार्थक कांबळे पडल्यावर शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. त्याच्या पालकांना घडलेली घटना सांगितली. या अपघातात सार्थक कांबळे याला जोराचा मार लागला. रुग्णालयात तातडीने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. सार्थक याला मित्रांनी दिलेला सल्ला ऐकला असता तर ही दुर्देवी घटना घडली नसती. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

शाळेत गेल्यावर मुलगा परत येईल, अशी वाट पाहणाऱ्या सार्थकच्या पालकांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर शाळेत मुले शिस्त पाळतात की नाही, यावर शिक्षकांनी लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.

राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.