पुण्यात पत्रकाराची सुपारी, सिनेस्टाईल थरार, जीवाची बाजी मारत पोलिसांनी आरोपींच्या नांग्या ठेचल्या

पुण्यात एका पत्रकारावर तब्बल दोनवेळा जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणी पुणे पोलिसांनी अतिशय सिनेस्टाईल पद्धतीने आरोपींच्या नांग्या ठेचल्या आहेत.

पुण्यात पत्रकाराची सुपारी, सिनेस्टाईल थरार, जीवाची बाजी मारत पोलिसांनी आरोपींच्या नांग्या ठेचल्या
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 9:43 PM

पुणे : पुण्यात थेट पत्रकाराचीच सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आला आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारांनी तब्बल दोन वेळा संबंधित पत्रकाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींकडून पत्रकारावर दोन वेळा हल्ला करण्यात आला. अखेर या प्रकरणातील निष्ठूर आरोपींना शोधून काढण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. पुणे पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे पुणे पोलिसांना आरोपींकडे हत्यारं देखील सापडली आहेत. संबंधित प्रकरण उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एखादी व्यकी शुल्लक कारणावरुन इतक्या खालच्या टोकावर कशी जाऊ शकते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी प्रथमेश उर्फ शंभू धनंजय तोंडे आणि अभिषेक शिवाजी रोकडे यांना अटक करण्यात आलीय. या गुन्ह्यात चार अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोपींकडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, एक जीवंत काढतूस, तीन कोयते, चार दुचाकी, तीन मोबाईल असा एकूण 2 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्ट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पत्रकारावर मे आणि जून महिन्यात जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. पिस्तुलातून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. अखेर आरोपींना जेरबंद करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे.

हे सुद्धा वाचा

आधी कोयत्याने हल्ला, दुसऱ्यांदा गोळीबार

पत्रकारावर मे महिन्यात अज्ञात पाच जणांनी मिरची पूड टाकून कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पत्रकार जीव वाचवण्याच्या उद्देशाने तिथून पळून गेला. यामुळे त्याचा जीव बचावला. पण त्यानंतर पुन्हा जूनमध्ये मास्कधारी अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळी झाडून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हादेखील तक्रारदार पत्रकार हा थोडक्यात बचावला होता.

पोलिसांनी आरोपींना नेमकं कसं पकडलं?

याप्रकरणी पुणे पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून शंभर पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तापासून पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून 2 लाख 25 हजार यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यामध्ये एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतुस आणि तीन कोयते मिळाले आहेत.

आरोपींनी जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून सुपारी घेऊन पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला असल्याचं पोलीस तपासात समोर आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांच्या टीमने केली आहे.

Non Stop LIVE Update
Police : ना डॉक्टरी चालत, ना वकिली..कॉन्स्टेबल बनण्यासाठी कोण कोण आलं?
Police : ना डॉक्टरी चालत, ना वकिली..कॉन्स्टेबल बनण्यासाठी कोण कोण आलं?.
बघत राहिले, व्हिडीओ केला पण मदत कुणाची नाही; भररस्त्यात तरुणीची हत्या
बघत राहिले, व्हिडीओ केला पण मदत कुणाची नाही; भररस्त्यात तरुणीची हत्या.
महायुतीला हानी,अजितदादा पराभवाचे धनी? सोबत आलेले चुकले की सोबत घेणारे?
महायुतीला हानी,अजितदादा पराभवाचे धनी? सोबत आलेले चुकले की सोबत घेणारे?.
लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा, थेट ओबीसी संघटना रस्त्यावर
लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा, थेट ओबीसी संघटना रस्त्यावर.
संघ-भाजपच्या बैठकीत अजितदादांवर खापर, भाजपच्या निशाण्यावर दादा? तर...
संघ-भाजपच्या बैठकीत अजितदादांवर खापर, भाजपच्या निशाण्यावर दादा? तर....
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका.
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा.
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या.
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले..
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले...
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा.