पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्यांमध्ये तुफान हाणामारी! पाणी भरण्याच्या वादातून सिमेंटच्या पत्र्याने मारहाण

पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्यांमध्ये तुफान हाणामारी! पाणी भरण्याच्या वादातून सिमेंटच्या पत्र्याने मारहाण
येरवडा कारागृहात हाणामारी
Image Credit source: TV9 Marathi

Pune crime News : न कैद्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये कैदी किशोर मंजुळे आणि सोन शेटे हे दोघे जखमी झालेत.

प्रदीप कापसे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 21, 2022 | 7:58 AM

पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये (Pune Yeravda Jail Crime) दोन कैद्यांमध्ये (Yeravda Jail Fight News) हाणामारी झाली. यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. या मारहाणप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटकदेखील केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चक्क पत्र्याने यावेळी मारहाण करण्यात आली आहे. येरवडा कारागृहामध्ये पाणी भरण्यावरुन दोन कैंद्यामध्ये वाद झाला. सुरुवातील बाचाबाची होऊन नंतर हा वाद ताणला गेला आणि बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. चक्क सिमेंटच्या पत्रानं मारहाण करत कैदी एकमेकांमध्ये भिडले. या मारहाण प्रकरणी कारगृह पोलिसांनी (Yeravda Police, Pune News) गुन्हा दाखल करुन घेत दोघा कैद्यांवर कारवाईदेखील केली आहे.

मारहाण करणारे कैदी कोण?

टिकलसिंह गब्बरसिंह आणि अजिनाथ लक्ष्मण गायकवाड या दोघा कैद्यांवर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन कैद्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये कैदी किशोर मंजुळे आणि सोन शेटे हे दोघे जखमी झालेत. कारागृह अधिकारी अभिजीत यादव यांनी या मारहाणप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पाहा व्हिडीओ :  नाशिकमध्ये भीषण अपघात

नेमका राडा कसा झाला?

प्यायचं पाणी भरण्याच्यावरुन वाद झाल्याचं सांगितलं जातंय. येरवडा कारागृहात असलेल्या सर्कल क्रमांक एक कार्यालयामोर वाद झाला. कैदी टिकलसिंह आणि अजिनाथ गायकवाड यांचा सोनू शेटे आणि किशोर मंजुळेसोबत वाद झाला.

हे सुद्धा वाचा

हा वाद वाढत गेला आणि थेट हाणामारीलाच सुरुवात झाली. या मारहाणीवेळी टिकलसिंग आणि अजितनाथ यांनी सोनू शेटे आणि किशोर मंजुळेवर सिमेंटच्या पत्र्यानं मारहाण केली. यात जखमी झालेल्या शेटे आणि मंजुळे यो दोन्ही कैद्यावर तत्काळ उपचारही करण्यात आलेत. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करुन घेत दोघांवर अटकेची कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेलार हे अधिक तपास करत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें