Pune crime | पुणे जिल्ह्यात दरोड्याचे सत्र सुरूच ; पीपीई किट घालत मेडिकल उचकटले; दोन आठवड्यात तिसरी घटना

चोरट्यांनी पीपीई किट घालत मेडिकल उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर चोरांनी तिथून  पळ काढला. मात्र मेडिकलच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही फुटेज लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या आधारे पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Pune crime | पुणे जिल्ह्यात दरोड्याचे  सत्र सुरूच ; पीपीई किट घालत मेडिकल उचकटले; दोन आठवड्यात तिसरी घटना
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या

पुणे- पुणे जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या चोरी ,दरोड्याच्या घटना पोलिसांना डोकेदुखी ठरते आहे. जुन्नर येथे बँकेवर दरोडा,त्यानंतर मावळमध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये सशास्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता मावळ तालुक्यातील पवनानगर येथे एका मेडिकलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन चोरांनी,पीपीई किट घालून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न फसल्याने चोर तिथून पसार झाले आहेत. संबधित सर्वप्रकार सीसीटीव्हीमध्ये कॅमेऱ्यात चित्रित झालाय.

अशी घडली घटना

मेडिकल बंद झाल्यानंतर चोरट्यांनी पीपीई किट घालत मेडिकल उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर चोरांनी तिथून  पळ काढला. मात्र मेडिकलच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही फुटेज लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या आधारे पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

दोन आठवड्यातील तिसरी घटना यापूर्वी जुन्नर भागातील अनंत पतसंस्थेत दिवसाढवळ्या दरोडा टाकत दोन -तीन लाखांचाऐवज चोरट्यांनी लुटुन नेला. यामध्ये दुचाकीवरून आलेलया चोरट्यांनी व्यवस्थापकाकडे पैश्यांची मागणी केली. मात्र व्यवस्थापकाने पैसे देण्यास नकार देताच चोरटयांनी व्यवस्थापकाला गोळीमरून त्याची हत्या केली. त्यानंतर घटना स्थळावर उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यालाही पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांनी पैसे कुठे ठेवलेत हे विचारत पतसंस्थेत दरोडा टाकला. या चोरीची घटनाही सीसी टीव्हीमध्ये कैद झाली होती. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ निर्माण झाली होती. त्यानंतर मागील तीन-चार दिवसांपूर्वीच मावळ तालुक्यातही इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात घुसून पिस्तूलाचा धाक दाखवून 10 ते 15 हजार लुटून नेल्याची घटना घडली होती. घटनेदरम्यान चोरट्यांनी दुकान मालकांच्या गाडीच्या चाव्याही काढून नेल्या होत्या.

Virat Kohli : टी-ट्वेंटी विश्वचषकातल्या पराभवानंतर कोहलीचं एकदिवसीयचं कर्णधारपदही काढलं

Kharif Season : तुरीवर मर तर कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, असे करा व्यवस्थापन तरच पडेल पिक पदरात !

महाराष्ट्राची समृद्धी! मुंबई-नागपूर महामार्ग येत्या 2 महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार, शिर्डी ते नागपूर प्रवास करता येणार!

Published On - 12:02 pm, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI