AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरुजी तुम्हीसुद्धा, शाळेतील शिक्षकाने केला विद्यार्थीनीचा विनयभंग

शाळेतीलच चार अल्पवयीन मुलींना व्हॉट्सअ‍ॅपवरअश्लिल मेसेज पाठवले. या मुलींनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठत शिक्षकाविरोधात तक्रार केली. पोलिसांनी चिलवेरी याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

गुरुजी तुम्हीसुद्धा, शाळेतील शिक्षकाने केला विद्यार्थीनीचा विनयभंग
व्हॉट्सअप कॉलवरुन झालेल्या वादातून मित्राचा मित्रावर हल्ला
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 28, 2023 | 2:56 PM
Share

पुणे : कोणतीही शाळा असो आपल्याकडे गुरुंना सर्वात मोठे स्थान दिले गेले आहे. यामुळे पालक आपली मुलगी शाळेत असताना निर्धास्त असतात. मुलगी शाळेत सुरक्षित आहे, ही खात्री त्यांना असते. परंतु पुणे शहरातील ( Pune News ) कोंढवा परिसरातील एका इंग्रजी शाळेत जे घडले, त्यामुळे समस्त पालकवर्गांना धक्का बसणार आहे. शाळेतील शिक्षकच आपल्या विद्यार्थीनींना अश्लिल मेसेज पाठवत होते. आता मुलींनी तक्रार केल्यानंतर शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अविनाश गोविंद चिलवेरी (वय २३, येरवडा) हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. हा व्यक्ती शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून काम करत आहे. त्याने आपल्याच शाळेतीलच चार अल्पवयीन मुलींना व्हॉट्सअ‍ॅपवरअश्लिल मेसेज पाठवले. या मुलींनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठत शिक्षकाविरोधात तक्रार केली. पोलिसांनी चिलवेरी याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

संस्थाचालक करणार कारवाई

शाळेतील मुलींची शिक्षकाकडून छेड काढण्याची गंभीर दखल संबंधित शाळेच्या संस्थाचालकांनी घेतली आहे. त्या शिक्षिकाची शाळेतून हकालपट्टी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. शाळेत असे प्रकार होऊ नये, यासाठी शिक्षकांवरील निर्बंध कठोर केले जाणार आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच