AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नातू, मुलगा आणि आजोबा…एकाच कुटुंबातील तीन पिढ्या तुरुंगात; कुणावर काय आरोप?

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे मोठी खळबळ बघायला मिळाली. लोकांमधील संताप वाढला. आता या प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई केली जातंय. हेच नाही तर सुरेंद्र अग्रवाल यांना 28 तारखेपर्यंत आता पोलिस कोठडीत पाठवण्यात आलंय. त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले.

नातू, मुलगा आणि आजोबा...एकाच कुटुंबातील तीन पिढ्या तुरुंगात; कुणावर काय आरोप?
pune case
| Updated on: May 25, 2024 | 4:14 PM
Share

पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात अत्यंत खळबळजनक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात बघायला मिळाले. लोकांचा प्रचंड रोष वाढला. बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श गाडी चालवत दोघांना उडवले. यानंतर त्याला पोलिस ठाण्यात पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. या प्रकरणाची वरिष्ठांना माहिती न दिल्याने दोन पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली असून त्यांचे निलंबन करण्यात आले. या प्रकरणामुळे पुणे पोलिसांवर चौफेर टीका करण्यात येतंय. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचाही आरोप सातत्याने केला जातोय.

बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने पबमध्ये जाऊन पार्टी केली. यावेळी त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही होते. हेच नाही तर दोन पबमध्ये जाऊन त्यांनी दारू पिली. या पार्टीचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दारूच्या नशेत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श गाडी चालवत दोघांना उडवले होते. हा अपघात इतका जास्त भयानक होता की, तरूण आणि तरूणीचा जागीचे निधन झाले.

मुलाला वाचवण्यासाठी बिल्डर विशाल अग्रवाल यांनी चालकाला थेट सांगितले की, गाडी तूच चालवत होता हे सांग. मी तुला मोठे बक्षिस देईल. विशाल अग्रवाल याच्यावर पुरावा नष्ट करण्याचे कलम 201 लावण्यात आलंय. तसेच शासनाची फसवणूक केल्याने कलम 420 लावण्यात आलंय. विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. वडिलांनीच आपल्याला गाडी चालवण्याची परवानगी दिल्याचे अल्पवयीन मुलाने म्हटले.

आता या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आजोबांना देखील पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. हेच नाही तर सुरेंद्र अग्रवाल यांना 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आलंय. सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर देखील अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर कलम 365 आणि 368 कलम लावण्यात आले आहेत. सुरेंद्र अग्रवाल यांनी दोन दिवस ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला.

हेच नाही तर सुरेंद्र अग्रवाल यांच्याकडून ड्रायव्हरला जबाब बदलण्यासाठी दबाब आणला जात होता. यापूर्वी पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांची चाैकशी केली. सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांना पोलिसांनी बोलावलं होते. आता नातू, मुलगा आणि आजोबा हे तिन्ही जण तुरुंगात आहेत. पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांच्या घरावरही छापेमारी केलीये. सीसीटीव्ही फुटेजसोबत छेडछाड करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.