तरुणीला फोन कार करतो म्हणत पोलीस सतत करायचा मारहाण, अखेर कंटाळलेल्या कीर्तनकाराने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

मयत संजय मोरे हा तरुण कीर्तनकार होता. इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस महादेव जाधव हा एका मुलीस फोन का करतो, असे म्हणत सतत मारहाण करायचा. तसेच घरी जाऊनही धमक्या द्यायचा.

तरुणीला फोन कार करतो म्हणत पोलीस सतत करायचा मारहाण, अखेर कंटाळलेल्या कीर्तनकाराने उचलले 'हे' टोकाचे पाऊल
इंदापूरमध्ये पोलिसाच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 6:38 PM

इंदापूर : पोलिसाच्या जाचाला (Harassment) कंटाळून एका तरुण (Youth) कीर्तनकाराने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी इंदापूरमध्ये उघडकीस आली आहे. संजय दशरथ मोरे असे मयत कीर्तनकाराचे नाव आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस (Indapur Police) आरोपी पोलीस कर्मचारी महादेव जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

मयत संजय मोरे हा तरुण कीर्तनकार होता. इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस महादेव जाधव हा एका मुलीस फोन का करतो, असे म्हणत सतत मारहाण करायचा. तसेच घरी जाऊनही धमक्या द्यायचा.

तरुणाने वारंवार स्पष्टीकरण देऊनही पोलीस छळायचा

तरुण किर्तनकाराने त्या पोलिसास स्पष्टीकरण देताना त्याचे मोबाईल फोनही दाखवले होते. आपण कधीच कुणाला फोन केला नव्हता, ते सांगितले होते. मात्र तरीही तो पोलिसाने त्याला बोलवून घेत अनेक ठिकाणी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

हे सुद्धा वाचा

अखेर जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

अखेर या जाचाला कंटाळून तरुण कीर्तनकाराने आत्महत्या केली. त्यानंतर या पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून मृत कीर्तनकाराच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या केला होता. मृतदेह ही पोलीस ठाण्यात काही वेळ आणला होता.

पोलीस निरीक्षकाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी पोलीस यंत्रणेला कायद्यानुसार काम करु द्या असे आवाहन केले. प्रथमतः या प्रकरणाची अकस्मात मयत दप्तरी नोंद करण्यात येईल. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्यांचे जबाब नोंदवले जातील.

या जबाबात कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. आरोपी कोणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले होते. आज अखेर त्या पोलिसावर गुन्हा दाखल झाला आहे.

या यासंदर्भात मृत कीर्तनकाराच्या बहिणीने इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.