Pune Crime |लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाल्याने स्वीकारला दुचाकीचोरीचा मार्ग ; 13 दुचाकीसह वाहन चोर अटकेत

अख्तर कोरोनाच्यापूर्वी सेंट्रिंगची कामे करायचा. या कामात त्याला व्यवस्थित पैसेही मिळत होते. मात्र कोरोना आला आणि त्याचे काम बंद झाले. घरात येणारा पैसा बंद झाला. आर्थिक चणचण भासू लागली. सेन्ट्रींगचे काम बंद झाल्यनंतर इतर कामे शोधण्याचा प्रयत्नही केला. मात्र कुठेही काममिळाले नाही.

Pune Crime |लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाल्याने स्वीकारला दुचाकीचोरीचा मार्ग ; 13 दुचाकीसह वाहन चोर अटकेत
crime

पुणे – अचानक ओढवलेल्या कोरोनाच्या(Coroan) संकटाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. याकाळात अनेकांचे रोजगारही गेले. बेरोजगारीचा(Unemployment)  वाईट परिणाम अनेकांच्या आयुष्यवर झालेला दिसून आला. असाच काहीसा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. लॉकडाऊनमध्ये रोजगार गेला. त्यानंतर  प्रयत्न  करूनही कुठेही रोजगार मिळाला नाही. मात्र कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तरुणानं चक्क दुचाकी चोरीला सुरुवात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अख्तर चांद मुजावर, सातारा या वाहनचोराला अटक केल्यानंतर घटनेचा उलघडा झाला आहे. बंडगार्डन पोलिसांनी अख्तरला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 13 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

आधी करायचा सेंट्रिंगचे काम

मूळचा सातारचा असलेला अख्तर कोरोनाच्यापूर्वी सेंट्रिंगची कामे करायचा. या कामात त्याला व्यवस्थित पैसेही मिळत होते. मात्र कोरोना आला आणि त्याचे काम बंद झाले. घरात येणारा पैसा बंद झाला. आर्थिक चणचण भासू लागली. सेन्ट्रींगचे काम बंद झाल्यनंतर इतर कामे शोधण्याचा प्रयत्नही केला. मात्र कुठेही काममिळाले नाही. यातूनच त्याने वाहने चोरीचा मार्ग स्वीकारला.

असा झाला उलगडा
सैफन चांदसाब मुजावर , बिबवेवाडी यांनी आपली दुचाकी ससून रुग्णालयाच्या पार्किंग मधून चोरीला गेल्याची तक्रार बंडगार्डन पोलिस (Bandgarden Police) स्थानकात दिली. यापूर्वीही वाहन चोरीच्या तक्रारी पोलिसात आल्या होता. या तक्रार दाखल करत पोलिसांनी तपासास सुरुवात केली. त्यानंतरसीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक व्यक्ती संशयास्पद पद्धतीने वाहनाची चोरी केल्याचे समोर आले . तर दुसरीकडे तो व्यक्ती अप्पर बिबवेवाडीतील डॉल्फिन चौकात दुचाकीसह संशयास्पद स्थितीत थांबला. पोलीस दिसताच तो पळून जाऊ लागला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडले. त्यानंतर या गुन्ह्याची उकल झाली.

बंडगार्डन पोलिसांनी आरोपी अख्तर कडून ससून रुग्णालय परिसरातून चोरलेल्या -6, बिबवेवाडी-2 , सहकारनगर, कोरेगाव पार्क , सातारा येथून चोरलेल्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे या गुन्ह्यांची उकल केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली आहे.

 

भंडारा शहराचा जीव गुदमरतोय, ‘भाऊ’गर्दी वाढली, चौकाचौकात शुभेच्छा फलकांचा भडीमार

वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा शेतकऱ्यांकडे तगादा; …तर थेट डीपीचाच विद्युत पुरवठा केला जातोय खंडित

Ravikant Tupkar Accident | शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात, दुचाकीस्वार येऊन धडकले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI