AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा शेतकऱ्यांकडे तगादा; …तर थेट डीपीचाच विद्युत पुरवठा केला जातोय खंडित

महावितरणने शेतकऱ्यांकडील थकबाकी वसुलीला सुरुवात केली आहे. ज्या डीपीवरील 50 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे कर्ज असेल, त्या डीपीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे.

वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा शेतकऱ्यांकडे तगादा; ...तर थेट डीपीचाच विद्युत पुरवठा केला जातोय खंडित
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 10:04 AM
Share

नंदुरबार – महावितरणने शेतकऱ्यांकडील थकबाकी वसुलीला सुरुवात केली आहे. ज्या डीपीवरील 50 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे कर्ज असेल, त्या डीपीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फटका हा ज्या शेतकऱ्यांकडे महावितरणाची थकीबाकी नाही, त्यांना बसताना दिसून येते आहे. पूर्ण डीपीचाच विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे त्यांना देखील आपल्या पिकाला पाणी देता येत नाही. महावितरणच्या या धोरणामुळे वीजबिल भरून देखील पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महावितरणने यातून काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

अंधारात राहण्याची वेळ

जिल्ह्यात आता ऊसतोडणी आणि रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात झाल्याने, अनेक मजूर रात्री शेतातच मुक्कामाला राहातात. मात्र विद्युत पुरवठा खंडित केल्याने त्यांच्यावर अंधारात राहाण्याची पाळी आली आहे. विद्युत पुरवठा खंडित असल्याने त्यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी देखील दूरवर जावे लागते.  तसेच अंधार असल्यामुळे रात्रीच्यावेळी जंगली श्वापदाच्या हल्ल्याची भीती नाकारता येत नाही. या सर्व अडचणी लक्षात घेऊन विद्युत विभागाने सरसकट विद्युत पुरवठा खंडित करू नये. ज्या ग्राहकांनी वीजबिल भरले नाहीत, त्यांचाच वीज पुरवठा खंडित करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

विद्युत बिल भरण्यास वेळ द्यावा

दरम्यान यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक वाया गेले होते. अति पावसाने पीक खराब झाल्याने शेतकऱ्याला योग्य मोबदला देखील मिळाला नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर आता गेल्या दोन तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे देखील नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने विद्युत बिल वसुलीतून काहीकाळ सूट देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

संबंधित बातम्या 

धक्कादायक: रस्त्यावरील खड्ड्यामुळे हादरे बसल्याने रायफलमधून सुटली गोळी, हिंगोलीत जवानाचा मृत्यू!

Nashik| साहित्य संमेलन होणार दणक्यात; पालकमंत्र्यांसह 6 आमदारांनी दिले 55 लाख रुपये

Nashik| अवकाळी पावसाने द्राक्ष बागांवर संकटाची बरसात; शेतकऱ्यांची झोप उडाली!

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती