AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भंडारा शहराचा जीव गुदमरतोय, ‘भाऊ’गर्दी वाढली, चौकाचौकात शुभेच्छा फलकांचा भडीमार

भंडारा (Bhandara) शहराचा जीव गुदमरतोय! ऐकून धक्का बसला न पण हे खरे आहे. भंडारा शहरात 'भाऊ'गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असून चौकाचौकात शुभेच्छा फलकांचा (Banner) भडिमार केल्याने शहराचे विद्रुपिकरण सुरु झाले आहे. आपला मोठेपणा मिरविण्यासाठी वूगल्लीतील मिसुरडेही न फुटलेली पोर स्वत:ला भाई अन भाऊ म्हणवून घेत लोकांच्या उरावर उगीच शुभेच्छा अभिनंदन आणि स्वागताचा भडिमार करीत असल्याचे चित्र उभे आहे.

भंडारा शहराचा जीव गुदमरतोय, 'भाऊ'गर्दी वाढली, चौकाचौकात शुभेच्छा फलकांचा भडीमार
Bhandara Banner Issue
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 10:07 AM
Share

भंडारा : भंडारा (Bhandara) शहराचा जीव गुदमरतोय! ऐकून धक्का बसला न पण हे खरे आहे. भंडारा शहरात ‘भाऊ’गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असून चौकाचौकात शुभेच्छा फलकांचा (Banner) भडिमार केल्याने शहराचे विद्रुपिकरण सुरु झाले आहे. आपला मोठेपणा मिरविण्यासाठी वूगल्लीतील मिसुरडेही न फुटलेली पोर स्वत:ला भाई अन भाऊ म्हणवून घेत लोकांच्या उरावर उगीच शुभेच्छा अभिनंदन आणि स्वागताचा भडिमार करीत असल्याचे चित्र उभे आहे. यात तुमचा शौक असला तरी आमचा जीव गुदमरतोय असा आवाज भंडारा शहरातून चौकाचौकातुन येत आहे.

ताई, दादा, अक्का, भाऊ, साहेब, पाटील, राव-साव सारे सक्रिय

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून अनेकांना सार्वजनिकरित्या फ्लेक्स, बॅनर झळकवता आले नव्हते. यंदा मात्र सर्वांनी नामी संधी साधुन घेतली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिति, नगर पालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने सर्व गल्ली बोळ्यातील नेत्यांचे प्रेम उफाळून आले आहे. त्यामुळे ताई, दादा, अक्का, भाऊ, साहेब, पाटील, राव-साव सारे सक्रिय झाले आहे.

गणेशोत्सवापासून सुरु झालेल्या हा प्रकार दिवाळी आणि नववर्षापर्यंत राहणार आहे. त्यामुळे भंडारा शहरातील कलेक्टर चौक, जिल्हा परिषद चौक, मोठा बाजार, लाल बहादुर शास्त्री चौक, गांधी चौकात फलक लोबंकाळत दिसत आहेत. या फलकांमुळे वाहतुकीला मोठा व्यत्यय येत असून मोठ्या अपघातास निमंत्रक ठरत आहेत. आता या प्रकरणी भंडारा वासियांनी कंबर कसली असून नगर परिषदेद्वारे कारवाईची मागणी केली जात आहे.

अनधिकृत पोस्टर, फ्लेक्स, बॅनरवर नगर परिषद कारवाईचा बडगा उगारणार

विशेष म्हणजे नगर परिषद भंडारा यांचे शहरात अधिकृत होर्डिंग असून त्यांचा कर नगर परिषदेला नियमित मिळत असतो. मात्र, बाकी सर्व बर्थडे, स्वागत, अभिनंदन फ्लेक्स, बॅनर हे अनधिकृत असून त्यांची कुठलीही परवानगी नगर परिषद भंडारा यांनी दिली नाही. त्यामुळे अशा अनधिकृत पोस्टर, फ्लेक्स, बॅनरवर आता नगर परिषद प्रसाशन कारवाईचा बडगा उगारणार आहे.

संबंधित बातम्या :

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निकाल : शशिकांत शिंदे-शंभूराज देसाईंना पराभवाचा धक्का, सहकारमंत्र्यांची बाजी

MLC election : काँग्रेसकडून विधान परिषदेच्या ‘या’ दोन जागांसाठी उमेदवार जाहीर

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.