AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Hagawane Death Case : …तर मयुरीचंही वैष्णवीसारखंच झालं असतं, हगवणे कुटुंबाबाबत हादरवून टाकणारा खुलासा!

Vaishnavi Hagawane Death : वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. याच कुटुंबातील थोरली सून मयुरी हगवणे हिच्या माहेरच्या मंडळींनी धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत.

Vaishnavi Hagawane Death Case : ...तर मयुरीचंही वैष्णवीसारखंच झालं असतं, हगवणे कुटुंबाबाबत हादरवून टाकणारा खुलासा!
mayuri jagtap
| Updated on: May 22, 2025 | 5:46 PM
Share

Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील विवाहिती वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येच्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे लग्नात 51 तोळे सोनं, एक फॉर्च्यूनर कार तसेच चांदीची भांडी देऊनही वैष्णवीचा छळ चालूच होता. असे असतानाच आता हगवणे कुटुंबीयांची दुसरी सून मयुरी हगवणे यांनी पुढे येत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यानंतर मयुरी यांच्या माहेरच्या मंडळींनीही समोर येत धक्कादायक खुलासे केले आहेत. आमच्या मयुरीचीही वैष्णवीसारखीच परिस्थिती झाली असती, असा खळबळजनक दावाच मयुरीच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.

दोन्ही कुटुंबांचे धक्कादायक खुलासे

मयुरी जगताप यांची आई तसेच बंधू यासह वैष्णवी हगवणे हिचे आई-वडील यांनी एकत्र येत टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. या संवादात या दोन्ही कुटुंबांनी हगवणे कुटुंबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. या संवादादरम्यान हगवणे कुटंबाची मोठी सून मयुरी यांच्या कुटुंबीयांनाही हुंड्यासाठी विचारणा झाली होती का? असे विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना मयुरी यांच्या भावाने अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

…तर मयुरीसोबतही तेच झालं असतं

हगवणे कुटुंबाचे जास्त भांडण हे वैष्णवी हिच्याशीच होते. आमच्याकडे हुंड्यांची मागणी केली असती, पण झालं असं की वैष्णवीशी जसे त्यांची भांडणं वाढत गेली तसं मयुरी आणि तिचा पती हे वेगळं राहू लागले. त्यामुळे हगवणे कुटुंबाने त्यांची मयुरी आणि तिच्या नवरऱ्याची आर्थिक मदतच थांबवून टाकली. ते एकत्र राहिले असते तर आज जे वैष्णवीसोबत झालं तेच मयुरीसोबतही झालं असंत, असं खळबळजनक माहिती मयुरी हगवणे यांचे बंधू मेघराज जगताप यांनी सांगितले.

मयुरी जगपात यांनी काय गौप्यस्फोट केला?

माझं सुशील हगवणे यांच्याशी 2022 साली लग्न झालं. माझी नणंद, दीर, सासू हे कायम मला त्रास द्यायचे. माझ्या सासून लाड केले तर नणंद तिचे लाड करायला नको, असं सांगायची. त्यांनी छोट्या-छोट्या गोष्टींना घेऊन त्रास दिला. पण या सर्वांमध्ये चांगली बाब म्हणजे माझ्या पतींनी मला कायम साथ दिली. त्यांनी त्यांच्या मुलालाही मारहाण केलेली आहे. माझे पती माझी बाजू घ्यायचे म्हणून हगवणे कुटुंबाने त्यांनाही मारहाण केलेली आहे. आम्ही दीड वर्षांपासून वेगळे रहात होतो, असा खळबळजनक गौप्यस्फोट मयुरी जगताप यांनी केला आहे.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?