AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासऱ्यानं माझ्यावर हात.., चारित्र्यावर… हगवणे कुटुंबाचा नवा कारनामा समोर, मोठ्या सूनेनं सगळंच सांगितलं!

Vaishnavi Hagawane Death : वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्यानंतर हगवणे कुटुंबातील मोठ्या सूनेने मोठे गौप्यस्फोट केले आहेत.

सासऱ्यानं माझ्यावर हात.., चारित्र्यावर... हगवणे कुटुंबाचा नवा कारनामा समोर, मोठ्या सूनेनं सगळंच सांगितलं!
RAJENDRA HAGAWANE AND MAYURI JAGTAP
| Updated on: May 22, 2025 | 6:35 PM
Share

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे हिची सासू, सासरा आणि दीर आणि नणंद यांच्याविरोधात जानेवारी महिन्यातच गुन्हा दाखल करण्यात आला होता. हगवणे कुटंबाची मोठी सून मयुरी जगताप यांनी हगवणे कुटुंबाबाबत महिला आयोगात तक्रार दिली होती. मात्र तिथूनही कोणतीच कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे हगवणे कुटुंबीयांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतला होता, असा खळबळजनक दावाही हगवणे कुटंबाची मोठी सून मयुरी हगवणे यांनी केला आहे.

माझ्या नवऱ्यालाही मारहाण केली- मयुरी जगताप

जानेवारी 2022 मध्ये माझं सुशिल हगवणे यांच्यासोबत लग्न झालं होतं. माझी नणंद, दीर आणि सासू हे कायम मला त्रास देत होते. माझ्या सासूने माझे लाड केले तर तू तिचे लाड का करत आहेस? असं माझी नणंद माझ्या सासूला सांगायची. यात सर्वांत चांगली बाब म्हणजे या सर्व परिस्थितीत माझे पती माझ्यासोबत होते. ते माझ्या कायम पाठीशी होते. या सगळ्या गोष्टीत हगवणे कुटुंबाने त्यांच्या मुलालाही सोडलेलं नाही. माझ्या नवऱ्यालाही हगवणे कुटंबाने मारहाण केलेली आहे, असा खळबळजनक दावाही मयुरी जगताप केला आहे.

माझ्या सासऱ्याने माझ्यावर हात टाकला- मयुरी जगताप

गेल्या दीड वर्षांपासून आम्ही वेगळे राहात होतो. माझी नणंद आणि माझ्या दीराने माझ्या चारित्र्यावर संशय घेतलेला आहे. माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर हात टाकलेला आहे. त्यानंतर आम्ही वेगळं राहण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी तो यशस्वी होऊ दिला नाही, असाही खळबळजनक गौप्यस्फोट मयुरी जगताप यांनी केला.

..तर मीही जिवंत राहिले नसते- मयुरी जगताप

वैष्णवी हगवणे हिने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल थोडीजरी माहिती दिली असती तरी मी तिची साथ दिली असती. मी त्या घरात हिम्मत दाखवली म्हणून मी आज जिवंत आहे. मी गप्प बसले असते तर मी आज तुमच्यासोबत नसते, असंही मयुरी जगताप यांनी म्हटलंय.

दरम्यान, या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवी हिची सून, नणंद, नवरा यांना अटक करण्यात आली आहे. तर सासरा, दीर हे फरार आहेत. त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...