पाणी पुरीवरुन पती-पत्नीमध्ये क्षुल्लक वाद; पत्नीचे टोकाचं पाऊल, विष प्राशन करुन आत्महत्या

गहिनीनाथ आणि प्रतिक्षा हे जोडपे मूळचे सोलापूरचे रहिवासी आहेत. नोकरीनिमित्त पुण्यात राहत होते. गहिनीनाथ हा उच्च शिक्षित तरुण असून पुण्यात एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. गहिनीनाथचे लग्न दोन वर्षापूर्वीचं प्रतिक्षासोबत झाले होते.

पाणी पुरीवरुन पती-पत्नीमध्ये क्षुल्लक वाद; पत्नीचे टोकाचं पाऊल, विष प्राशन करुन आत्महत्या
पाणीपुरीवरुन पती-पत्नीमध्ये क्षुल्लक वाद; पत्नीचे टोकाचं पाऊल, विष प्राशन करुन आत्महत्या

पुणे : जगातील प्रत्येक नवरा बायकोमध्ये छोटेमोठे वाद, भांडणं होत असतात. अशा छोट्या-मोठ्या वादातून, रुसव्या-फुगव्यातून नवरा-बायकोचं नातं अधिक दृध होत जातं असं म्हणतात. मात्र क्षुल्लक कारणावरुन पतीसोबत झालेल्या वादातून एका महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. प्रतिक्षा सरवदे असे मयत महिलेचे नाव असून गहिनीनाथ सरवदे असे पतीचे नाव आहे. पतीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. (Wife commits suicide by consuming poison due to dispute over Panipuri)

काय आहे प्रकरण?

गहिनीनाथ आणि प्रतिक्षा हे जोडपे मूळचे सोलापूरचे रहिवासी आहेत. नोकरीनिमित्त पुण्यात राहत होते. गहिनीनाथ हा उच्च शिक्षित तरुण असून पुण्यात एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. गहिनीनाथचे लग्न दोन वर्षापूर्वीचं प्रतिक्षासोबत झाले होते. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. दोघेही पुण्यात आंबेगाव पठार परिसरात राहत होते. गहिनीनाथने ऑफिसमधून घरी येताना पाणीपुरी पार्सल आणली होती. मात्र यामुळे प्रतिक्षा संतापली. मला न विचारता पाणीपुरी का आणली म्हणून प्रतिक्षा चिडली. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले आणि प्रतिक्षाने पाणीपुरी खाण्यास नकार दिला.

याच रागातून गहिनीनाथनेही दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला डबा घेऊन जाण्यास नकार दिला. याच रागातून प्रतिक्षाने विष प्राशन केले. यानंतर प्रतिक्षा बेशुद्धावस्थेत घरी पडल्याने शेजाऱ्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान प्रतिक्षाचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रतिक्षाच्या वजिलांनी गहिनीनाथ विरोधात भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गहिनीनाथला अटक केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

औरंगाबादमध्ये पत्नीसमोर पतीने स्वतःचा गळा चिरला

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर एका पतीने आपल्या पत्नीसमोरच धक्कादायक कृत्य केलं आहे. पतीने बसस्थानकावर आपली पत्नी समोर उभी असताना स्वत:चा गळा धारदार शस्त्राने चिरून घेतला. ही घटना सोमवारी (30 ऑगस्ट) मध्यरात्री घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असनू जखमी पतीला औरंगाबादच्या शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जखमी पतीचे नाव भाऊसाहेब काकडे तर पत्नीचे राणी काकडे असे आहे. काकडे यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. (Wife commits suicide by consuming poison due to dispute over Panipuri)

इतर बातम्या

पुण्याच्या शंंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयात विविध पदांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

तुम्ही नादच केलाय थेटsss, ना IIT, ना ‘मोठी’ डीग्री, कोल्हापूरच्या अमृताला 41 लाखांचं पॅकेज!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI