AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime | सारस्वत बँकेकडून महिलेची 2.50 कोटीची फसवणूक ; बँकेच्या चेअरमन गौतम ठाकूरसह आठ जणांवर गुन्हा दाखल

फिर्यादीची कंपनी बँकेचे कर्ज रक्कम नियमित भरत असताना कर्ज रक्कम भरत नाही असे दाखवून फिर्यादी कंपनीची कर्ज खाती एनपीए झाल्याचे घोषित करुन फिर्यादी कंपनीच्या व आजी माजी संचालक व जमीनदार यांच्या वैयक्तिक मालकीच्या मालमत्ता जाणीवपूर्वक हडप करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

Pune crime | सारस्वत बँकेकडून महिलेची 2.50 कोटीची फसवणूक ; बँकेच्या चेअरमन गौतम ठाकूरसह आठ जणांवर गुन्हा दाखल
Bank Fraud
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 10:06 AM
Share

पुणे – सारस्वत को-ऑपरेटीव्ह बँकेकडून महिलेची 2.50 कोटीची फसवणूक झाल्याची घटना समोर आली. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात स्मिता पाटील या पीडित महिले तक्रार दिली आहे . कोथरूड पोलिसांनी सारस्वत बँकेच्या चेअरमनसह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल केल्याच माहिती कोथरूड पोलिसांनी दिली आहे. हा गुन्हा 23ऑगस्ट 2018 ते 10 जानेवारी 2020 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सारस्वतबँकेचे चेअरमन गौतम एकनाथ ठाकूर, व्यवस्थापकीय संचालक स्मिता संधाने , वसुली अधिकारी आनंद चाळके, झोनला व्यवस्थापकीय पल्लवी साळी, शाखा व्यवस्थापक अभिषेक भगत, झोनल व्यवस्थापक रत्नाकर प्रभाकर व इतर तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अशी केली फसवणूक

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीचे सारस्वत बँकेच्या विश्रांतवाडी शाखेत टर्म लोनचे खाते आहे. असे असताना बँकेचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालय व इतरांनी संगनमत करुन फिर्यादीच्या कंपनीच्या नावाने खोटे व बनावट कर्ज खाते कंपनीच्या संमती शिवाय काढले. ते खाते हे कंपनीचेच कर्ज खाते आहे, असे भासवले.  फिर्यादी कंपनीचे आजी माजी संचालक व जामीनदार यांना 23 ऑगस्ट 2018 रोजी 13 कोटी रुपयांचे वन टाईम सेटलमेंट प्रस्ताव दिला. कंपनीने त्यांच्या टर्म लोनच्या अधिकृत खात्यासाठी सुरक्षा म्हणून विना तारखेचे 6 धनादेश दिले होते. त्यातील एका धनादेशावर दीड कोटी रुपये व बँकेच्या अधिकृत कर्ज खात्यावर  भरण्याकरीता दिलेल्या धनादेशावर 1 कोटी रुपये एवढी रक्कम लिहून कंपनीच्या नावाने काढलेल्या खोट्या व बनावट कर्ज खात्यावर भरले. त्या रक्कमेचा आरोपींनी स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी वापर करुन फिर्यादीच्या कंपनीची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली. बँकेने असे गैरकृत्य करुन बँक  व्यवसायिक म्हणून स्वत:चे कर्तव्य पार न पाडता शेअर्सच्या सुरक्षापोटी दिलेले विना तारखेच्या धनादेशावर फिर्यादीच्या संमतीशिवाय परस्पर आरोपींनी तारीख  नमूद करुन त्याचा गैरवापर केला.

कर्जाचा भरणा करत नसल्याचा केला दावा फिर्यादीची कंपनी बँकेचे कर्ज रक्कम नियमित भरत असताना कर्ज रक्कम भरत नाही असे दाखवून फिर्यादी कंपनीची कर्ज खाती एनपीए झाल्याचे घोषित करुन फिर्यादी कंपनीच्या व आजी माजी संचालक व जमीनदार यांच्या वैयक्तिक मालकीच्या मालमत्ता जाणीवपूर्वक हडप करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने 156(3) प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेश कोथरुड पोलिसांना दिला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप अधिक तपास करीत आहेत.

Omicron in Aurangabad: दुबईहून आलेल्या व्यक्तीचे नातेवाईक निगेटिव्ह, औरंगाबादला आणखी कशाची चिंता?

उत्तर महाराष्ट्रातले मायाजालः 240 कोटींचे घबाड सापडले; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये छापे, 6 कोटींची रोकड, 5 कोटींचे दागिने जप्त

ट्रकसमोर बाईक आडवी घातली, कोयत्याच्या धाकाने चालकाला लुटलं, अल्पवयीन मुलासह दोघे जेरबंद

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....