AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात ओळख परेडवेळी पोलिसांनी नाव घेतात गजा मारणेने जोडले हात, व्हिडीओ व्हायरल

Gajanan Marne Video : पुण्यात आज सर्व गुंडांची पोलीस आयुक्तालयामध्ये शाळा भरलेली पाहायला मिळाली होती. दहशत पसरवणारे हाताची घडी घालून शांत उभे होते, यादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होते ज्यामध्ये गजा मारणे याचा हात जोडलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पुण्यात ओळख परेडवेळी पोलिसांनी नाव घेतात गजा मारणेने जोडले हात, व्हिडीओ व्हायरल
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 07, 2024 | 2:38 PM
Share

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत आहे. आजसुद्धा पुणे गुन्हेगारांमुळे चर्चेत आलं पण त्यामध्ये फरक होता. कारण आज पोलिसांनी गुन्हेगारांमध्ये दहशत पसरवली, याचं कारण म्हणजे पुण्याचे नवीन आयुक्त अमितेश कुमार. आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यावर पुण्यातील 267 गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलं होतं.

गुन्हेगारांची ओळख परेड सुरू असताना मीडियालाही लाईव्ह करण्याची परवानगी देत पोलिसांनी गुन्हेगारांना तंबी दिली. याआधी फक्त ज्या गुन्हेगारांची नावं ऐकलीत टोळीच्या म्होरक्यांना सर्वांनी पाहिलं. यामध्ये गजा मारणे, बंडू आंदेकर, निलेश घायवळ, बाब बोडकेसह इतरही टोळीच्या म्होरक्यांना ओळख परेडसाठी पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलं होतं. पोलिसांनी सर्व गुन्हेगारांची ओळख परेड करत त्यांना तंबी दिली. यावेळी कुख्यात गुंड गजा मारणे याने पोलिसांसमोर हात जोडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ:-

नेमंक काय झालं होतं?

पोलिसांनी सर्वांना बोलावत ओळख परेड केली त्यानंतर एकत्रितपणे सर्व टोळ्यांना काही सूचना केल्या. कोणत्याही गुन्ह्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी व्हायचं नाही. गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे  व्हिडीओ हे शेअर नाही झाले पाहिजेत. या सूचनांचं पालन नाही झालं तर तडीपार, मोक्का अशी कारवाई केली जाणार आहे. पोलीस अधिकाऱ्याने सर्वांना या सूचना  समजल्या का अशी विचारणा केली. त्यावेळी घायवळ, मारणे, पोटे यांची नावे घेतलीत.

दरम्यान, ज्यावेळी पोलीस अधिकाऱ्याने गजा मारणे यांचं नाव घेतल्यावर त्याने हात जोडल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस आता अॅक्शन मोडवर आले असल्याने आता पुण्याच्या गुन्हेगारीला आळा बसणार असं दिसत आहे. त्यामुळे सर्वसामन्यांनी सुटकेचा श्वास घेतला असावा.

Follow Us
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा