AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा ट्विस्ट ! अग्रवाल कुटुंब गोत्यात… नातू आणि मुलानंतर आता आजोबांची चौकशी; जुनं प्रकरण भोवणार?

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट आली आहे. याप्रकरणात नातू आणि मुलानंतर आता आजोबाही गोत्यात आले आहेत. छोटा राजनशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांची पुणे गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या प्रकरणात काय बाहेर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मोठा ट्विस्ट ! अग्रवाल कुटुंब गोत्यात... नातू आणि मुलानंतर आता आजोबांची चौकशी; जुनं प्रकरण भोवणार?
नातू आणि मुलानंतर आता आजोबांची चौकशी
| Updated on: May 24, 2024 | 2:39 PM
Share

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. त्याच्या वडिलांना म्हणजे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता त्याच्या आजोबांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्या  आजोबांची कसून चौकशी करण्यात येत आहे. एका जुन्या प्रकरणात ही चौकशी होत आहे. त्यामुळे अग्रवाल कुटुंब चांगलंच गोत्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे हिट अँड रनचं प्रकरण घडल्यानंतर अग्रवाल कुटुंबाचे छोटा राजनशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचीही गंभीर दखल घेतली आहे. पुणे गुन्हे शाखेने अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलीस आयुक्तालयात बोलावलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेंद्र अग्रवाल यांची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीतून काय मुद्दे समोर येतात? सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशीनंतर सुटका होणार की अटक? हे चौकशी संपल्यानंतरच समजणार आहे. तसेच ही चौकशी किती तास चालेल याची काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

काय आहे प्रकरण?

सुरेंद्र अग्रवाल यांचा त्यांच्या भावाशी संपत्तीवरून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी सुरेंद्र अग्रवाल यांनी 2007 आणि 2008मध्ये बँकाकला जाऊन छोटा राजनची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर शिवसेनेचे नेते अजय भोसले यांच्या हत्येची सुपारीही छोटा राजनला दिली होती. या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल आहे. त्यावेळी पुणे पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कारण अंडरवर्ल्डशी संबंधित प्रकरणात पोलीस मकोकाच्या अंतर्गत एफआयआर दाखल करतात. पण या प्रकरणात केवळ आयपीसीच्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवला होता. सुरेंद्र अग्रवाल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना अटकही केली नव्हती. छोटा राजनला अटक केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे आता पुन्हा हे प्रकरण उजेडात आलं असून पोलिसांनी पुन्हा एकदा सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी सुरू केली आहे.

 प्रकरण काय?

18 मे रोजी  अल्पवयीन आरोपीलने दारुच्या नशेत प्रचंड वेगात पोर्शे कार चालवली होती. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 15 तासात त्याची सुटका करण्यात आली होती. त्याला जामीन देण्यात आला होता. कोर्टाने त्याला 300 शब्दात निबंध लिहायला सांगितलं होतं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.