सोनमचा फोटो उलटा टांगला, तंत्रमंत्रही केलं, राजाचा नरबळी दिला? खळबळजनक दावा काय?
राजा रघुवंशी हत्याप्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. आता राजाच्या कुटुंबाने या घटनेमागे नरबळी आणि काळी जादू असल्याचा धक्कादायक संशय व्यक्त केला आहे.

संपूर्ण देशात सध्या राजा रघुवंशी हत्याप्रकरणाची चर्चा सुरु आहे. अशातच आता या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे. आता राजाच्या कुटुंबाने या घटनेमागे नरबळी आणि काळी जादू असल्याचा धक्कादायक संशय व्यक्त केला आहे. मृत राजा रघुवंशीचा भाऊ सचिन रघुवंशी यांनी असा आरोप केला आहे की, ‘सोनमचे कुटुंब काळ्या जादूवर विश्वास ठेवत होते, ज्याचा संबंध राजाच्या हत्येशी असू शकतो.’ याबाबत माहिती जाणून घेऊयात.
नरबळीचा संशय
राजाचा भाऊ सचिन रघुवंशीने आरोप केला आहे की, ‘आमचा संशय यामुळे आहे की, राज्याच्या हत्येनंतर जेव्हा सोनम बेपत्ता होती तेव्हा तिच्या कुटुंबाने काळ्या जादूचा आधार घेतला होता आणि तिचा फोटो उलटा लटकवला होता. हे केल्यानंतर काही दिवसांनी सोनम परत सापडली होती’. त्यामुळे राजाचा नरबळी दिला तर नाही ना असा संशय वाढला आहे.
राजाचा भाऊ सचिन रघुवंशीने काय म्हटले?
सचिन रघुवंशीने सांगितले की, ‘जेव्हा राजाचा मृतदेह इंदूरला आणण्यात आला तेव्हा सोनमच्या वडिलांचे वर्तन खूपच असामान्य होते. सुरुवातीला ते शांत होते, त्यांच्या चेहऱ्यावर विशेष हावभाव नव्हते. मात्र राजाच्या मृत्यू प्रकरणात सोनमवर आरोप होताच वडील देवी सिंह यांनी माध्यमांशी भांडणे सुरू केली.’
पुढे बोलताना सचिनने सांगितले की, ‘अचानक झालेला हा बदल आणि त्यांचे आक्रमक वर्तन अनेक गोष्टी सुचित करते, त्यामुळे आम्हाला काळ्या जादूचा संशय आहे.’ आता सचिन रघुवंशी यांनी आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे. तसेच सोनमचा भाऊ गोविंद यानेही नार्को चाचणीची मागणी केली आहे.
प्रेम विवाह हा गुन्हा नाही – गोविंद
सोनमचा भाऊ गोविंदने या प्रकरणाच्या चौकशीबाबत सांगितले की, “शिलाँग पोलिसांनी मला बोलावले आहे, मी काही दिवसांत जाईन. लग्न करताना सर्वत्र जातीचा मुद्दा आहे, परंतु प्रेम विवाह हा गुन्हा नाही. सोनमने राजाशी लग्न करण्यास सहजपणे सहमती दर्शविली होती. या दोघांची भेटही झाली होती. मात्र हत्येनंतर आतापर्यंत राजच्या कुटुंबाशी कोणतीही भेट झालेली नाही.”
दरम्याम, सोनम आणि राजाचे लग्न 11 मे रोजी झाले होते. लग्नानंतर दोघेही हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते, तिथे राजाची हत्या करण्यात आली. सोनम आणि तिच्या प्रियकरावर राजाच्या हत्येचा आरोप आहे. पोलिस या दोघांचीही चौकशी करत आहेत.
