काकीचा भाच्यावर बलात्काराचा आरोप, त्यानंतर कोर्टात जे सत्य समोर आलं, त्याने काकीवरच उलटा फिरला गेम
मानवी नात्याला काळीमा फासणार एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. काकीनेच आपल्या भाच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात कोर्टात जे घडलं, सत्य समोर आलं, ते काकीलाच उलट खूप महाग पडलं.

मानवी नातेसंबंधांमध्ये प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते. काही नाती रक्ताची नसली, तरी त्यात मायेचा ओलावा असतो. काका काकी, मामा-मामी, आत्या, चुलत भाऊ बहिण अशी नाती काहीवेळा सख्ख्या नात्यापेक्षा जवळची वाटतात. पण काहीवेळा अपवादाने अशा नात्यांना कलंकीत करणाऱ्या घटना घडतात. एखाद्यावर खोटा आरोप लावणं कधी-कधी खूप महाग पडू शकतं. असच राजस्थानच्या अलवरमध्ये राहणाऱ्या एकामहिलेसोबत झालं. तिने आपल्या अल्पवयीन भाच्यावर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला. पण कोर्टाने निकाल दिला. त्यात कोर्टाने महिलेलाच दोषी ठरवलं. तिला 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
एक पुरावा भारी ठरला. या पुराव्यामुळे सर्व सत्य समोर आलं. तिजारा पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या गावातील एका महिलेने 11 ऑगस्ट 2024 रोजी नात्यात लागणाऱ्या अल्पवयीन भाच्यावर बलात्काराचा आरोप केलेला. त्याच्याविरोधात तक्रार नोंदवलेली. FIR मध्ये म्हटलेलं की, मागच्या 6 महिन्यापासून भाचा बलात्कार करतोय. महिलेने आरोप केलेला की, भाचा आपल्याला फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देतो.
दोघांमध्ये मोबाइलवर तब्बल कितीवेळा बोलणं?
पोलिसांनी चौकशी करताना दोघांची कॉल रेकॉर्डिंग काढली. दोघांमध्ये 6 महिन्यात जवळपास 832 वेळा मोबाइलवर बोलणं झालेलं. पोलिसांना प्रकरणात संशयास्पद वाटलं. ज्यावेळी बलात्काराचा आरोप केला, त्यावेळी भाचा अल्पवयीन होता. चौकशीत समोर आलं की, महिलेवर बलात्कार झालेला नाही. कुटुंबीय बाहेर गेल्यानंतर महिलाच भाच्याला घरी बोलवायची.
‘काकी आईसमान असते’
हे सर्व पुरावे पोलिसांनी कोर्टात सादर केले. साक्षीदार आणि पुरावे मिळाल्यानंतर कोर्टाने महिलेला दोषी ठरवत 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. खटला सुरु असताना महिला गर्भवती होती. तिला एक मुलगा झाला. तो आता 9 महिन्यांचा आहे. आरोपी महिलेने मुलाला आपल्यासोबत तुरुंगात नेण्यासाठी कोर्टाकडे अर्ज केला. मुलगा लहान असल्याने कोर्टाने तिचा अर्ज मंजूर केला. या खटल्याची सुनावणी पॉक्सो कोर्ट नंबर-4 मध्ये झाली. न्यायाधीश हिमांकनी गौड यांनी निकाल वाचन करताना सांगितलं की, “काकी आईसमान असते. हे कृत्य लाजिरवाणं आहे. महिलेला 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल”
