ब्यूटी पार्लरच्या बहाण्याने घराबाहेर पडली, लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच बायको पळाली

पत्नीने महिला आयोगात पतीने हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दिली होती ( wife wedding Anniversary beauty parlor)

ब्यूटी पार्लरच्या बहाण्याने घराबाहेर पडली, लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच बायको पळाली
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 3:39 PM

जयपूर : लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी ब्यूटी पार्लरला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडलेली बायको परतलीच नाही. अखेर वाट बघून नवरा आग्य्राला तिच्या माहेरी पोहोचला. मात्र तिथेही जावईबापूंना थारा दिला नाही. त्यामुळे वैतागलेल्या नवऱ्याने तिच्या माहेरच्या घरासमोरच बसकण मारली. 31 तास वाट पाहिल्यानंतरही पतीदेवाला रिकाम्या हातीच घरी परतावे लागले. (Rajasthan wife run away to Maternal Place on first wedding Anniversary in name of beauty parlor)

राजस्थानातील अजमेरमधील वैशाली नगरमध्ये राहणाऱ्या अविनाश वर्मा याचा विवाह उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सुलहकुल नगरातील तरुणीशी झाला होता. अविनाश अकाऊण्टंट आहे, तर त्याचे वडील सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत. लग्नाच्या वाढदिवशी बायको ब्यूटी पार्लरला जाण्याच्या निमित्ताने सासरहून निघाली. बराच वेळ झाला तरी ती परत आलीच नाही.

बायको पळाली माहेरी

अविनाशने बायकोला फोन लावला. ती थोड्या वेळात येते, असं म्हणत चालढकल करु लागली. त्यामुळे अविनाशला संशय आला. अखेर तिने आपण माहेरी आल्याचं कबूल केलं. तो नेमकं काय झालंय, हे पाहण्यासाठी तिच्या मागून माहेरी – आग्य्राला गेला. मात्र सासुरवाडीला जावईबापूंचे स्वागत झालेच नाही. कोणी साधा दरवाजाही उघडला नाही.

बायकोची हुंड्यासाठी छळाची तक्रार

काही वेळाने सासुरवाडीहून निरोप आला, की मुलगी तीन दिवसांनी परत येईल. हेही नसे थोडके म्हणत अविनाशराव निघाले. काही दिवसांनी अविनाशच्या घरी अजमेर पोलीस पोहोचले. तेव्हा समजलं, की पत्नीने महिला आयोगात अविनाशने हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश अजमेर पोलिसांना देण्यात आले होते. ‘अमर उजाला’ वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

अख्खी रात्र सासुरवाडीच्या गेटवर ठिय्या

अविनाशला त्याच्या आई-वडिलांनीच संपत्तीतून बेदखल केलं. त्यालाही नोकरीही गमवावी लागली. बायको फोनवर बोलू लागली, पण नांदायला यायला तयार होईना. बायकोचा अंतिम निर्णय जाणून घेण्यासाठी अविनाश गेल्या शनिवारी पुन्हा तिच्या माहेरी गेला. मात्र तो येताच बायको नातेवाईकांकडे गेली. फोनही घेईना. अविनाश अख्खी रात्र सासुरवाडीच्या गेटवर ठिय्या देऊन होता. रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत वाट बघून तो घरी परतला.

शेजाऱ्यांकडून जेवणाची व्यवस्था

बायको ताकास तूर लागू देत नसताना बायकोच्या शेजाऱ्यांनी मात्र त्याला जेवण-खाण देण्याची तयारी दाखवली, अविनाशने मात्र ऑनलाईन जेवण मागवलं. शेजाऱ्यांनी दयेपोटी त्याची झोपण्याची व्यवस्था केली. मात्र बायकोने दर्शन न दिल्यामुळे अविनाश पेचात आहे.

संबंधित बातम्या :

प्रेम विवाह झालेल्या दाम्पत्यात टोकाचे वाद, उशीने तोंड दाबून पत्नीची हत्या

ब्लाऊजने गळा आवळून सासूची हत्या, पोत्यात भरुन मृतदेह झुडपात फेकला, पिंपरीत मुलगा-सूनेला अटक

(Rajasthan wife run away to Maternal Place on first wedding Anniversary in name of beauty parlor)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.