हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, प्रचंड मारहाण, प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न

सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने विष प्राशान करुन आत्महत्या केली आहे.

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, प्रचंड मारहाण, प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न
crime
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: चेतन पाटील

Jul 26, 2021 | 3:31 PM

जयपूर : राजस्थानमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने विष प्राशान करुन आत्महत्या केली आहे. तरुणीने आत्महत्या करण्याआधी रुग्णालयातून एक व्हिडीओ बनवत सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राजस्थान हादरलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेवर अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पीडित विवाहितेचे वडील हे भीलवाडा पोलिसात हेडकॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. पीडितेच्या वडिलांचं नाव भैरुलाल असं आहे. पीडितेचं अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी म्हणजेच 26 एप्रिलला विक्रम नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होतं. पण हेच लग्न तिच्या मृत्यूला कारण ठरलं. कारण लग्नानंतर लगेच तिच्या कुटुंबियांनी तिच्या पाठीमागे हुंड्याचा तगादा लावला. हुंड्यासाठी सासरच्यांनी पीडितेला प्रचंड मारहाण आणि छळ केला. या छळाचा जाचाला कंटाळून अखेर तिने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला.

पीडितेला रुग्णालयात दाखल करावं लागलं

पीडितेला गेल्या आठवड्यात सासरच्यांनी इतकी मारहाण केली की तिला अखेर रुग्णालयात दाखल करावं लागलं. पीडितेची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु असताना तिने मोबाईलवर एक व्हिडीओ बनवला. तो व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पीडितेने सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं व्हिडीओत म्हटलं आहे.

पीडिता व्हिडीओत नेमकं काय म्हणाली?

पीडितेने आत्महत्या करण्याआधी मोबाईलवर तयार केलेल्या व्हिडीओत सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले. “मला सासरच्यांनी मारहाण करत जंगलात नेलं. त्यानंतर तिथे त्यांनी माझ्या अंगावरील कपडे काढून प्रचंड मारहाण केली. यावेळी त्यांनी प्रायव्हेट पार्टमध्ये मिर्ची पूड टाकण्याचा देखील प्रयत्न केला. पण अखेर मी कसंतरी तिथून जीव वाचवून पळून गेली”, असा गंभीर आरोप पीडितेने व्हिडीओत केलाय.

“ते माझ्या अंगावर बसले. अंगावर बसून त्यांनी मला मारहाण केली. ते माझ्याकडून 6 लाख रुपयांचा हुंडा मागायचे. पण माझ्याजवळ तर साधे 6 हजार रुपये देखील नव्हते. माझ्या सासू-सासऱ्याने तर मला जबरदस्ती विष प्राषाण करायला लावलं. आय अॅम सॉरी !”, असं पीडिता म्हणाली.

“माझी सासू, सासरा, ननंद हे माझ्या मृत्यूला कारणीभूत आहेत. या लोकांनी मला मारहाण केली. माझे कपडे फाडून मला सासरे, दोन्ही दिरांसमोर उघडं शरीर दाखवत मारहाण केली”, असंदेखील पीडिता म्हणाली.

पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया

दुसरीकडे पीडितेचे वडील भैरुलाल यांनी लग्नावेळी सोने-चांदिचे दागिने, टीव्ही, फ्रिज, कूलर, कपाट, भांडे दिले होते, अशी माहिती दिली आहे. “एवढ्या वस्तू दिल्या तरीही मुलीची सासू माझ्याकडून 6 लाख रुपयांची मागणी करत होती. मुलीच्या सासूने सांगितलं होतं की, 6 लाख पाठवा आणि मुलीचं बसवा. मी जेव्हा पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी तिच्या सासरी गेलो. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हते”, अशी माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली. या घटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा : 

कॉलेजसमोरच्या भोजनालयात मालक दाम्पत्याची आत्महत्या, मेसमध्येच गळफास घेतलेले मृतदेह आढळले

अंधेरीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघींची सुटका, तिघांना अटक

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें