अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप, संधी मिळताच कोविड सेंटरमधून पळ, रायगड पोलिसात खळबळ

| Updated on: Jul 22, 2021 | 12:42 AM

कैद्यासाठी तात्पुरत्या उभारलेल्या अलिबाग-नेहुली जिल्हा क्रिडा संकुल येथील तात्पुरत्या स्वरुपाच्या कोविड सेंटर कारागृहातून बलात्काराच्या आरोपीने पलायन केल्याची घटना समोर आली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप, संधी मिळताच कोविड सेंटरमधून पळ, रायगड पोलिसात खळबळ
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप, संधी मिळताच कोविड सेंटरमधून पळ, रायगड पोलिसात खळबळ
Follow us on

रायगड : कैद्यासाठी तात्पुरत्या उभारलेल्या अलिबाग-नेहुली जिल्हा क्रिडा संकुल येथील तात्पुरत्या स्वरुपाच्या कोविड सेंटर कारागृहातून बलात्काराच्या आरोपीने पलायन केल्याची घटना समोर आली आहे. या आरोपीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याला उपचारासाठी कैद्यांसाठी असेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये तात्पुरतं ठेवण्यात आले होते. तिथून त्याने पलायन केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जेल प्रशासनाने तातडीची पावले उचलीत सर्व स्तरावर शोध मोहीम हाती घेतली आहे.

योग्य संधी साधून धूम ठोकली

अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील 68 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा कारागृहात कैद्यांची संख्या पाहता काही कैद्यांवर नेहुली येथील क्रीडा संकुलाच्या इमारतीत तात्पुरते स्वरुपात कारागृह कक्ष तयार करुन तिथे उपचार सुरु आहेत. यामध्ये पोलादपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेला नाईकू उर्फ देवा मारुती दगडे हा आरोपी देखील उपचार घेत होता. या आरोपीने योग्य संधी साधून धूम ठोकल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांचे आवाहन

संबंधित आरोपीला जानेवारी 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. तो जानेवारी 2018 पासून जिल्हा कारागृहात होता. दगडे याने 20 जुलैला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कैद्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेल्या नेहुली येथील कोविड आरोपी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पलायन केले. व्यवसायाने वाहन चालक असलेल्या देवा दगडे याची उंची 165 सेमी इतकी आहे. त्याच्याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास अलिबाग पोलिसांसोबत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

शाहरुख खानसोबत भेट घडवून देण्याचा बहाणा, दादर स्थानकावर अल्पवयीन मुलीचं अपहरण, पोलिसांनी कसं सोडवलं ?