AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेखा जरे हत्याकांड, फरार आरोपी बाळ बोठेला दिलासा की दणका? कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष

आरोपी बाळ बोठेला कोर्टासमोर हजर राहण्याची गरज नाही, वकिलांमार्फत तो कोर्टाकडे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करु शकतो

रेखा जरे हत्याकांड, फरार आरोपी बाळ बोठेला दिलासा की दणका? कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष
Rekha Jare Murder Case
| Updated on: Dec 15, 2020 | 12:20 PM
Share

अहमदनगर : ‘यशस्विनी ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे (Rekha Jare) यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज (15 डिसेंबर) सुनावणी होणार आहे. या सुनावणीत बाळ बोठेला (Bal Bothe) दिलासा मिळतो की दणका हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रेखा जरेंची जातेगावच्या घाटात हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपींची चौकशी केल्यानंतर या घटनेचा मुख्य सूत्रधार हा पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. मात्र तेव्हापासून बाळ बोठे फरार आहे. शर्थीचे प्रयत्न करुनही तो सापडत नाही. मात्र, असं असलं तरी त्यानं वकील अॅड महेश तवले यांच्यामार्फेत कोर्टाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. ज्यावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. (Rekha Jare Murder Case Bal Bothe Bail Hearing)

फरार बाळ बोठेला काहीसा दिलासा

रेखा जरे हत्याकांडात मुख्य आरोपी बाळ बोठेला सोमवारी काहीसा दिलासा मिळाला. कारण, जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी कोर्टात हजर राहण्याची गरज नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलं अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपी बाळ बोठेनं हजर राहावं, असा अर्ज पोलिसांनी कोर्टाकडे केला. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. मात्र, कोर्टाने तपास अधिकाऱ्यांची ही मागणी नामंजूर केली. आरोपी बाळ बोठेला कोर्टासमोर हजर राहण्याची गरज नाही, वकिलांमार्फत तो कोर्टाकडे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करु शकतो असं कोर्टानं म्हटलं.

बाळ बोठे फरार, खबरीही झाले फितूर?

रेखा जरेंच्या हत्याकांडात नाव आल्यापासूनच बाळ बोठे फरार झाला. पोलीस खात्याची आणि गुन्हेगारी विश्वाची बाळ बोठेला चांगलीच माहिती आहे. शिवाय पोलिसांचे अनेक खबरीही बाळ बोठेला ओळखतात असं बोललं जातं. त्यामुळेच पोलिसांना दिवसाची रात्र करुनही तो सापडत नाही. पोलिसांनी कुठलंही पाऊल उचलण्याआधी त्याला सगळी माहिती मिळते आणि तो लपून बसलेल्या ठिकाणावरुन फरार होतो. त्यामुळे पोलिसांचेच खबरीही फितूर झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. (Rekha Jare Murder Case Bal Bothe Bail Hearing)

रेखा जरेंच्या कुटुंबाला संरक्षण

हत्याकांडात बळी गेलेल्या रेखा जरेंच्या कुटुंबाला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलं आहे. बाळ बोठेकडून कुटुंबाला धोका असल्याचा अर्ज रेखा जरेंचा मुलगा कुणाल जरेने पोलिसांकडे केला होता. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबाला संरक्षण पुरवलं आहे. दरम्यान, ज्या आरोपींनी कुणालसमोर त्याच्या आईची हत्या केली, त्या आरोपींना कुणालने ओळखलं आहे. पोलिसांनी घेतलेल्या ओळख परेडमध्ये त्यानं सर्व आरोपींच्या चेहऱ्यांवर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे आता कोर्टासमोर रेखा जरेंची हत्या करणाऱ्यांची ओळख अधिक स्पष्टपणे मांडली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

जातेगावच्या घाटात हिरो झालेला बाळा बोठे, जातेगावच्या घाटातच व्हिलन कसा झाला?

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या हनी ट्रॅपचं ‘मटेरियल’ वाचलंत?

रेखा जरे हत्याकांड | अटकेपासून वाचण्यासाठी बाळ बोठेची तगमग

(Rekha Jare Murder Case Bal Bothe Bail Hearing)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.