मी धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेते, कारण… : रेणू शर्मा

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी सर्व आरोप मागे घेतले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:00 PM, 22 Jan 2021
मी धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेते, कारण... : रेणू शर्मा

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी सर्व आरोप मागे घेतले आहेत. तसेच मुंडेंविरोधात केलेल्या सर्व तक्रारी मागे घेत असल्याचं सांगितलंय. त्यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली. यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधी पक्षाने हा मुद्दा उचलल्याने मी राजकीय षडयंत्राचा बळी ठरत असल्याचं लक्षात आल्याने मी हा निर्णय घेतल्याचं रेणू शर्मा यांनी म्हटलंय (Renu Sharma withdrawal rape complaint against Dhananjay Munde).

रेणू शर्मा म्हणाल्या, “मी धनंजय मुंडे यांच्याविरोधात लग्नाचं आश्वासन देऊन बलात्काराचा जो आरोप केला होता त्यावर मी माझी भूमिका स्पष्ट करत आहे. धनंजय मुंडे आणि माझ्या बहिणीच्या नात्यात काही दिवसांपासून तणाव होता. त्यांचं हे प्रकरण न्यायालयात गेल्याने मी मानसिक तणाव आणि दबावात आले होते. मात्र, आता विरोधी पक्ष देखील त्यांच्याविरोधात जात असल्याच पाहून राजकारणातील मोठ्या षडयंत्राचा बळी ठरत आहे असं मला वाटतंय.”

“काही लोक माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवत आहेत. हे सर्व चुकीचं आहे. मला माझ्या घरातील माणसांची नावं खराब करायची नाहीत. शेवटी मी इतकंच सांगेल की मी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील सर्व तक्रारी मागे घेत आहे. मला त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार करायची नाहीये. माझी लग्नाचं आश्वासन न पाळण्याची किंवा बलात्काराची कोणतीही तक्रार नाही. तसेच माझा कोणताही अयोग्य फोटो किंवा व्हिडीओ देखील नाही. मी हे सर्व अगदी विचारपूर्वक सांगत आहे,” असंही रेणू शर्मांनी आपल्या निवेदनात म्हटलं.

हेही वाचा :

धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

…म्हणून रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे, भाजप नेत्या उमा खापरेंचा मोठा गौप्यस्फोट

धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे, भाजपचे कृष्णा हेगडे म्हणतात ‘सत्यमेव जयते’

व्हिडीओ पाहा :

Renu Sharma withdrawal rape complaint against Dhananjay Munde