धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे, भाजपचे कृष्णा हेगडे म्हणतात ‘सत्यमेव जयते’

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली असल्यास मी खुश आहे, असं भाजप नेते कृष्णा हेगडे म्हणाले (Krishna Hegde Renu Sharma )

धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे, भाजपचे कृष्णा हेगडे म्हणतात 'सत्यमेव जयते'
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 8:24 AM

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा (Renu Sharma) यांनी मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी पोलिसांना लेखी दिलं आहे. त्यानंतर रेणू शर्मांनी आपल्यालाही ब्लॅकमेल केल्याचा आरोप करणारे भाजप नेते कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी समाधान व्यक्त केले. (Krishna Hegde on Renu Sharma withdrawing Rape accusation against Dhananjay Munde)

कृष्णा हेगडे म्हणतात सत्यमेव जयते

“रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली असल्यास मी खुश आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो. सत्यमेव जयते… रेणू शर्मा रिलेशनशीपसाठी माझ्याही मागे लागली होती. पण हे प्रकरण संपलंय, त्यामुळे त्यांच्याविरोधात मला काहीही सांगायचं नाही. बॉलिवूडमध्येही मीटूचे अनेक प्रसंग घडले होते. खऱ्या पीडितांसोबत आपण कायम उभं राहायला पाहिजे, पण या प्रकरणात मला आणखी काही बोलावंसं मला वाटत नाही.” अशी प्रतिक्रिया भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

कृष्णा हेगडे यांनी काय आरोप केले होते?

“मी रेणू शर्मा यांना दोनदा भेटलो आहे. रेणू मला वारंवार संपर्क करुन रिलेशनशिपबाबत विचार असत” असा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला होता. कोणा महिलेला बदनाम करुन मला काही मिळणार नाही, मात्र दोन तीन जणांशी ती असं वागली आहे. म्हणून आता तक्रार नोंदवली. माझ्यासाठी हा राजकीय मुद्दा नाही. धनंजय मुंडे यांना मी ओळखतही नाही” असं कृष्णा हेगडेंनी स्पष्ट केलं होतं.

पहिलं राजकीय मीटू : हेगडे

“मी कोणत्या महिलेवर उगाचच आरोप कशाला करु? धनंजय मुंडे, मनीष धुरी यांच्याबाबतही असं झालं आहे. हे हनी ट्रॅपचं जाळं आहे. आपल्या जाळ्यात पकडून लुटायचं. आज धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालं आहे. उद्या माझ्याबाबतही झालं असतं, असे कृष्णा हेगडेंनी सांगितले.

“मनीष धुरी यांचाही कॉल आला होता, ते सुद्धा तसंच सांगत होते. ते डायरेक्ट पैसे मागत नाहीत. ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये कोणी असतं, सिंगर असतात, तेव्हा म्युझिक अल्बमसाठी पैशाची गरज असते,” असेही कृष्णा हेगडे म्हणाले. (Krishna Hegde on Renu Sharma withdrawing Rape accusation against Dhananjay Munde)

लांबूनच आभार मानतो

मी धनंजय मुंडेंना ओळखतो. त्यांना 2012 मध्ये एकदाच भेटलो होतो. पण ते माझे मित्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय मदतीसाठी धावून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असंही ते म्हणाले. रेणू शर्मा यांनी हेगडे यांचा आदर करत असल्याचं सांगितलं. त्याबाबत हेगडे यांना विचारले असता, त्या माझ्या आदर करतात. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण आदर दुरूनच करा. मीही त्यांचे लांबूनच आभार मानतो, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे

मनसेच्या मनीष धुरींनाही रेणू शर्माचे कॉल, कृष्णा हेगडेंनी वात पेटवली

हेगडेंकडूनच माझ्याशी बोलायला सुरुवात, सरनाईकांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटलो; रेणू शर्मांचा दावा

(Krishna Hegde on Renu Sharma withdrawing Rape accusation against Dhananjay Munde)

Non Stop LIVE Update
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.