AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे

राज्याचे सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jan 22, 2021 | 7:59 AM
Share

मुंबई :   राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. (rape complaint from Renu Sharma Withdraw Against Dhananjay Munde)

गेल्या दोन आठवड्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहसंबंधाचा खुलास केला होता. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे आरोपांनी घायाळ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा म्हणावा लागेल.

रेणू शर्मांचा आरोप काय?

पार्श्वगायनाच्या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याच्या आमिषाने, बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक-निर्मांत्याशी भेट घडवण्याच्या आमिषाने धनंजय मुंडे यांनी इच्छेविरुद्ध आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले, तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप रेणू शर्मा यांनी केला होता.

रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार धनंजय मुंडे यांच्याशी 1997 मध्ये त्यांची ओळख झाली होती. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटल्याची माहिती आहे.

धनंजय मुंडे यांचा दावा काय?

समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्रं प्रसारित करुन माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (करुणा शर्मा यांच्या सख्ख्या लहान बहीण) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे.

करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत.

मात्र 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.

या बाबत 12 नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये श्रीमती करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतुने, मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत आणि खाजगी साहित्य प्रकाशित केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात श्रीमती करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे.

सदर याचिकेत उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात श्रीमती करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही. माझी या संदर्भात प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावे अशी विनंती आहे.

तथापी रेणू शर्मा यांनी माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक आणि माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रतिदेखील समाज माध्यमातून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत, श्रीमती करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा आणि त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणे आणि माझ्या कडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे.

माझ्याकडे श्रीमती रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईल वरून मला ब्लॅंकमेलिंग कोट्यवधी रुपये मागितल्याचे sms रुपी पुरावे आहेत. तसेच मी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये श्रीमती करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो.

(rape complaint from Renu Sharma Withdraw Against Dhananjay Munde)

हे ही वाचा :

LIVE | धनंजय मुंडेंना दिलासा, बलात्काराची तक्रार मागे

Follow Us
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली