AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न 4 दिवसांवर असताना तरुणीचं अपहरण, भिगवणमध्ये तणाव, आता त्याच तरुणीचा व्हिडीओ समोर; म्हणाली मी स्वत: …

भिगवण येथे एका तरुण मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे सांगितले जात होते. लग्न दोन दिवसांवर आलेले असताना अपहरण झाल्याच्या दाव्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे.

लग्न 4 दिवसांवर असताना तरुणीचं अपहरण, भिगवणमध्ये तणाव, आता त्याच तरुणीचा व्हिडीओ समोर; म्हणाली मी स्वत: ...
BHIGWAN WOMEN CRIMEImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 18, 2026 | 7:41 PM
Share

सांगली जिल्ह्यातील भिगवण येथे एका तरुणीचे अपहरण केल्याची धक्कादायक दावा केला जात होता. आई आणि भावासोबत लग्नाची खरेदी करुन घराकडे जात असताना तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून हे अपहरण करण्यात आल्याचा दावा केला जात होता. विशेष म्हणजे मुलीचे लग्न चार दिवसांवर आलेले असताना हे कृत्य करण्यात आले आहे, असे म्हटले जात होते. याबाबत आता वेगळी आणि प्रकरणाला कलाटणी देणारी माहिती समोर आली असली तरी भिगवण येथे मात्र काही काळासाठी तणावाची स्थिती झाली होती.

नेमकं काय घडलं?

भिगवण येथे एक तरुणी आपला भाऊ तसेच आईसोबत लग्नाची खरेदी करुन घरी जात होती. त्याच वेळी आरोपी आयान शेख आणि अजहर शेख यांनी गाडी आडवून डोळ्यात चटणी फेकली. तरुणीच्या आईने तसेच भावाने अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन तरुणीला छोटा हत्ती गाडी आणि दुचाकीवर घेऊन गेल्याचा दावा केला जात होता.

भिगवणमध्ये वातावरणात तणाव

हे कथित प्रकरण समोर आल्यानंतर भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी भिगवणला जात या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून नातेवाईकांना, पोलिसांना पाठवला जातोय. मुलीचे लग्न पुढच्या दोन-चार दिवसात होते. अशा परिस्थितीमध्ये मुलीचे अपहरण केले आहे, असा दावा पडळकर यांनी केला होता.

सत्य आलं समोर

दरम्यान, पडळकर यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर भिगवण येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तेथील नागरिकांनी भिगवण बंदची हाक दिली होती. तसेच या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनीही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परंतु आता या प्रकरणी मोठा ट्विस्ट समोर आला आहे. ज्या तरुणीचे अपहरण करण्यात आले आहे, असा दावा केला जात होता, त्या मुलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत मी संबंधित मुलासोबत माझ्या मर्जीने पळून गेले होते, असे ती सांगत आहे. सोबतच माझे संबंधित मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचेही त्या मुलीने सांगितले आहे. त्यामुळे आता या कथित अपहरणाच्या प्रकरणाावर पडदा पडणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Follow Us
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...