AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलेला हिसडा देऊन पळू निघालेल्या चोरट्यांना नागरिकांना पकडलं, नंतर बेदम मारहाण केली, मग…

यावेळी त्यांच्या पुढे असलेल्या एका कार चालकाने आरशात हा सर्व प्रकार बघितला. गाडीतील डाव्या साईडला बसलेल्या तरुणाने गाडीचा दरवाजा उघडला आणि संशयित तिघांची दुचाकी थेट दरवाजाला धडकून ते रस्त्यावर पडले.

महिलेला हिसडा देऊन पळू निघालेल्या चोरट्यांना नागरिकांना पकडलं, नंतर बेदम मारहाण केली, मग...
sangli crime newsImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 14, 2023 | 10:49 AM
Share

सांगली : सांगली शहरातील (sangli city) अतिशय वर्दळीच्या असणाऱ्या कोल्हापूर रस्त्यावर (kolhapur road) दुचाकी घेऊन निघालेल्या महिलेच्या पर्सला हिसडा मारणाऱ्या तिघा दुचाकीस्वारांना नागरीकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयितांनी महिलेला रस्त्यावरून अक्षरशः फरपटत नेले. भरदिवसा ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हजारोंच्या जमावाने गर्दी करत तिघांना ताब्यात दिले. त्यातील दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सुरज सत्ताप्पा भोसले, वैभव कृष्णांत पाटील आणि मुनीब मुस्ताक भाटकर अशी त्या तिघांची नावे आहेत. या घटनेत महिला जखमी झाली. दरम्यान, या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्हीत (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे.

हरिपूर रोडवर राहणाऱ्या साधना सातपुते या त्यांची मोपेड दुचाकी पंक्चर झाल्याने त्यांच्या मुलीसह गाडी ढकलत कोल्हापूर रोडवरून बस स्थानक परिसराकडे निघाल्या होत्या. यावेळी संशयित तिघे त्यांच्या जवळ आले. त्यांनी मदत करण्याचा बहाणाकरून सातपुते यांच्या हातातील पर्स हिसका मारून पळून घेऊन जाऊ लागले. यावेळी सातपुते यांनी धैर्य दाखवत पर्स सोडली नाही. संशयितांनी त्यांना 200 फूट पुढे फरपटत रस्त्यावरून घेऊन गेले.

यावेळी त्यांच्या पुढे असलेल्या एका कार चालकाने आरशात हा सर्व प्रकार बघितला. गाडीतील डाव्या साईडला बसलेल्या तरुणाने गाडीचा दरवाजा उघडला आणि संशयित तिघांची दुचाकी थेट दरवाजाला धडकून ते रस्त्यावर पडले. परिसरात असलेल्या नागरिकांनी धाव घेत तिघांना बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांची दुचाकी जप्त करून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी दोघेजण हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, भर वस्तीत अशी घटना घडल्याने पोलिसांच्या गस्तीवर जमावाने प्रश्‍न चिन्ह उपस्थित केला. भरवस्तीत चोरीच्या घटनेमुळे हजारोंचा जमाव परिसरात जमला होता. अक्षरशः अर्धा तास नागरीकांनी संशयितांना धरून ठेवले होते. पोलिसांना कळवल्यानंतर अर्धा तासाने पोलिसांनी इंट्री मारली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.