टोल भरण्यावरुन वाद, साताऱ्यात 12 ते 15 जणांची सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

| Updated on: Oct 27, 2021 | 8:35 AM

बंगळुरु महामार्गावर (Banglore Highway) टोल भरण्याच्या कारणावरुन कराड जवळ असणाऱ्या तासवडे टोलनाक्यावर 12 ते 15 जणांनी सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.

टोल भरण्यावरुन वाद, साताऱ्यात 12 ते 15 जणांची सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण
Satara Dispute
Follow us on

सातारा : बंगळुरु महामार्गावर (Banglore Highway) टोल भरण्याच्या कारणावरुन कराड जवळ असणाऱ्या तासवडे टोलनाक्यावर 12 ते 15 जणांनी सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.

टोल भरण्यावरुन वाद

कोल्हापूर येथून साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रव्हल्सचा टोल भरण्यावरुन हा राडा झाला असल्याची माहिती आहे. फास्टॅग स्कॅनिंग होत नसल्याने बाचाबाचीतून हा वाद मोठा झाल्याची माहिती आहे.

राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

26 तारखेच्या पहाटे टोल नाक्यावरील झालेल्या या राड्याचा व्हिडीओ समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. याबाबतची तक्रार तळबीड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ –

 

चायनिजच्या गाडीवर गल्ल्यावरुन राडा

भिवंडीतील म्हाडा कॉलनी परिसरात चायनिजच्या गाडीवर काम करणाऱ्या कामगारांमध्ये रात्री उशिरा राडा झाला. यामध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. मात्र उपचार होण्यापूर्वीच त्याला प्राण गमवावे लागले. तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

शफिक मोहम्मद शेख असं चायनिजच्या गाडीवर झालेल्या राड्यात मृत्युमुखी पडलेल्या 32 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो म्हाडा कॉलनीतील भाजी मार्केट महाड कॉलनी परिसरात राहत होता.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वंजारपट्टी म्हाडा कॉलनी येथील मेट्रो हॉटेल परिसरातील एका चायनीज गाडीवर हा प्रकार घडला. पैशांचा गल्ला शफीक शेख घेऊन जात असल्याने चायनिज गाडीवरील अफजल सिद्दीकी, अफसर सिद्दीकी, बशीर अन्सारी, नूर मोहम्मद सिद्दीकी आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशा पाच जणांनी त्याला अडवले.

छाती आणि पोटावर बेदम मारहाण

शफीकला लाथा बुक्क्यांनी तोंड, छाती आणि पोटावर बेदम मारहाण केल्याने तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला स्व इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

संबंधित बातम्या :

निर्जन स्थळी चाकूच्या धाकाने प्रेमी युगुलांची लूट, CCTV मुळे अखेर दोन गुंड जाळ्यात

पिंपरी चिंचवडमध्ये बाल गुन्हेगारीत प्रचंड वाढ, 110 गंभीर गुन्ह्यात तब्बल 135 अल्पवयीन मुलं

पत्नी छातीवर बसली, प्रियकराने गळा दाबला, रात्रभर पतीच्या मृतदेहासोबत झोपली, अंगावर काटा आणणारा हत्येचा घटनाक्रम