निर्जन स्थळी चाकूच्या धाकाने प्रेमी युगुलांची लूट, CCTV मुळे अखेर दोन गुंड जाळ्यात

अनेक वेळा घाबरलेली जोडपी कुटुंबीयांना समजण्याच्या भीतीने तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यातही पोहोचत नाहीत. अशा स्थितीत आरोपी या प्रेमी युगुलांना चाकूच्या धाकाने घाबरवत चोरीमारी करायचे.

निर्जन स्थळी चाकूच्या धाकाने प्रेमी युगुलांची लूट, CCTV मुळे अखेर दोन गुंड जाळ्यात
प्रेमी युगुलांची लूट करणारे आरोपी
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 9:20 AM

भोपाळ : निर्जन ठिकाणी प्रेमी युगुलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारे चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहेत. चाकूच्या धाकाने आरोपी हे प्रेमी युगुलांची लूटमार करत असल्याचा आरोप आहे. लुटलेली चेन आणि अंगठी पोलिसांनी दोन आरोपींकडून जप्त केली आहे.

नातेवाईकांच्या भीतीने मध्य प्रदेशातील इंदौरमधील प्रेमी युगल अनेक वेळा खजराना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निर्जन भागात जाऊन बसत, याच संधीचा फायदा घेत चोरटे लुटमारीच्या घटना घडवत असत.

युगुलांच्या भीतीचा फायदा

अनेक वेळा घाबरलेली जोडपी कुटुंबीयांना समजण्याच्या भीतीने तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यातही पोहोचत नाहीत. अशा स्थितीत आरोपी या प्रेमी युगुलांना चाकूच्या धाकाने घाबरवत चोरीमारी करायचे.

पीडितेच्या तक्रारीमुळे वाचा

एका पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अशाच प्रकारे लुटणाऱ्या टोळीतील दोघांना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी नसीर आणि सुलतान यांनी यापूर्वी प्रेमी युगुलांची लूट केली होती.

झटपट श्रीमंतीचं व्यसन

पोलीस पकडलेल्या दोन्ही लुटारुंची सध्या चौकशी करत आहेत. आरोपींच्या ताब्यातून लुटलेली सोनसाखळी आणि अंगठी पोलिसांनी जप्त केली आहे. लवकरच श्रीमंत होण्याचे स्वप्न उराशी बाळगून चोरट्यांनी गुन्हेगारीच्या मार्गावर जात लूटमार करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत स्टेशन प्रभारी दिनेश वर्मा यांनी सांगितले की, प्रेमी युगुलांना लुटणाऱ्या दोघांना आम्ही पकडले आहे. एकांताचा फायदा घेऊन हे लोक प्रेमी युगुलांना लुटायचे. अद्याप चौकशी सुरू आहे.

संबंधित बातम्या :

पिंपरी चिंचवडमध्ये बाल गुन्हेगारीत प्रचंड वाढ, 110 गंभीर गुन्ह्यात तब्बल 135 अल्पवयीन मुलं

खेळता-खेळता रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडले, मुंबईत दोन चिमुरड्यांचा बुडून मृत्यू

4 साथीदार, 4 महिने प्लॅनिंग, विम्याच्या 37 कोटींसाठी मनोरुग्णाचा खून, नगर हादरलं

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.