विसर्जनासाठी गेल्या, तीन सख्या बहिणी, त्यांच्या चार मैत्रिणी पाण्यात बुडाल्या, उत्साहाचं वातावरण क्षणार्धात बदललं

झारखंच्या लातेहार जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. लातेहारच्या बालूमाथ येथे करमा विसर्जनासाठी गेलेल्या सात मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे

विसर्जनासाठी गेल्या, तीन सख्या बहिणी, त्यांच्या चार मैत्रिणी पाण्यात बुडाल्या, उत्साहाचं वातावरण क्षणार्धात बदललं
प्रातिनिधिक फोटो

रांची : झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. लातेहारच्या बालूमाथ येथे करमा विसर्जनासाठी गेलेल्या सात मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. संबंधित घटना ही बालूमाथ पोलीस ठाणे हद्दीतील शेरेगाडा गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. एकाच गावातील सात मुलींचं अशाप्रकारे निधन झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. संपूर्ण गाव शोकात आहे. या घटनेमुळे गावातील उत्साहाचं रुपांतर क्षणार्धात दु:खात झालंय. मृतक मुलीचं वय हे 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे. विशेष म्हणजे मृतक मुलींमध्ये तीन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जातेय.

नेमकं काय घडलं?

अकलू गंझू हे आपल्या कुटुंबियांसोबत गावात वास्तवास होते. त्यांच्या तीन मुलींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोरी-बालूमाथ-शिवपूर रेल्वे लाईन निर्मितीसाठी एक मोठं खड्डं खोदण्यात आलं होतं. याच खड्ड्यात पावासामुळे पाणी साचल्याने हे खड्डं तलावासारखं झालं होतं. त्यामुळे मुली या खड्ड्यात करमा डाल विसर्जनासाठी गेल्या होत्या. या दरम्यान संबंधित घटना घडली.

गावकऱ्यांकडून मुलींना वाचवण्याचा प्रयत्न

संबंधित घटना घडल्यानंतर काही प्रत्यक्षदर्शी गावात धावात गेले. त्यांनी गावकऱ्यांना याबाबत सांगितलं. त्यानंतर गावकरी धावत घटनास्थळी आले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. गावकऱ्यांनी मुलींना बाहेर काढलं. पण तोपर्यंत 4 मुलींचा मृत्यू झाला होता. इतर तीन मुलींचा श्वास सुरु होता. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी तीनही मुलींचा मृत्यू झाल्याचं घोषित झालं.

गावकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी

या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. मृतक मुलींच्या कुटुंबियांनी तलावाजवळ आक्रोश करत हंबरडा फोडला. संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं. मृतकांच्या नातेवाईकांची अवस्था बघून इतर गावकऱ्यांच्या देखील डोळ्यांमध्ये पाणी आलं. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सातही मुलींची आकस्माक मृत्यूची नोंद केल्याची माहिती समोर आली आहे. सातही मुलींचे मृतदेह शवविच्छेदसानाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

करमा पर्व सण नेमका काय?

भारतात झारखंड, छत्तीसगड आणि ओदिसा या राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. हा सण सात दिवसांचा असतो. हा सण बहिण-भावाच्या प्रती असणाऱ्या प्रेमाचा प्रतिक आहे. या सणासाठी महिला आपल्या माहेरी एक आठवडा आधीच येतात. करमाचे अनेक लोकगीते आहेत. त्यामध्ये बहीण-भावाचे प्रेम, सुख-दुख आणि संकटावर भाष्य करण्यात आलंय. हा आदिवासी समाजासाठी एक मोठा सण मानला जातो. सात दिवसांनंतर करमा डालचे सकाळी नदी किंवा तलावात विसर्जन केले जाते.

हेही वाचा :

अमेरिकेतील पतीकडून पत्नीवर हुंड्यासाठी अमानवीय अत्याचार; मित्रांना पाठवले अश्लील मेसेज, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

मावस भावासोबत अनैतिक संबंध, तीन मुलांची आई असूनही पतीची निर्घृण हत्या, प्रियकरासाठी काहीही

खबरदार साक्ष फिरवलीत तर!!! हत्या प्रकरणी फितूर आई-मुलावर खटला भरण्याचे औरंगाबाद सत्र न्यायालयाचे आदेश

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI