AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Mohol Murer | शरद मोहोळ खून प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांना सापडल्या तब्बल 18 हजार..

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येला तब्बल एक महिना उलटून गेला आहे. त्यातच आता या खूनप्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. या हत्याकांडाचा तापस करत असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 18 हजार..

Sharad Mohol Murer | शरद मोहोळ खून प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांना सापडल्या तब्बल 18 हजार..
| Updated on: Feb 07, 2024 | 9:30 AM
Share

पुणे | 7 फेब्रुवारी 2024 : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येला तब्बल एक महिना उलटून गेला आहे. गँगवॉरमधून पाच जानेवारी रोजी शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी 24 तासांत 8 आरोपींना अटक केली. तर त्यानंतर आणखी 15 आरोपींनाही अटक केली. या हत्येनंतर काही दिवसांनी पोलिसांनी हत्याकांडातील प्रमुख आरोपी, मास्टमाईंड गणेश मारणेला 1 फेब्रुवारी रोजी नाशिकरोड येथून अटक केली. हत्येनंतर तो विविध राज्यात फिरत देवदर्शन करत असल्याचे तपासात उघड झाले. महिन्याभरानंतरही या हत्याकांडाप्रकरणी रोज नवनवे खुलासे होत असून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

त्यातच आता या खूनप्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. या हत्याकांडाचा तापस करत असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 18 हजार ऑडिओ क्लिप शोधल्याचे समोर आले आहे. शरद मोहोळ, तसेच अटकेतील सर्व आरोपींचे मोबाईल तपासल्यानंतर त्यामधून या सर्व क्लिप्स सापडल्या आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल 18 हजार 827 ऑडिओ क्लिपपैकी 10 हजार 500 ऑडिओ क्लिप तपासल्या. त्यापैकी सहा ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळून आल्या आहेत. त्यांचा अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान शरद मोहोळ याच्या खून प्रकरणी गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर याला अटक केली आहे. तपासादरम्यान साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्यातील संभाषणात अभिजित मानकरचे नाव समोर आले . त्यानंतर पोलिसांनी अभिजीत मानकर याला बेड्या ठोकल्या.

पुण्यातील कोथरुड परिसरात ५ जानेवारी रोजी शरद मोहोळ याचा, साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. जुन्या वादातून राग मनात ठेवून, तसेच मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी दिवसाढवळ्या ही हत्या करण्यात आली होती.

शरद मोहोळच्या पत्नीला धमकी

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येला एक महिना झाल्यावर शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना मेसेज आला आहे. या मेसेजमुळे कोथरूड परिसरात खळबळ उडाली. शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या मुन्ना पोळेकर याच्या नावाने अकाऊंट बनवण्यात आलं आहे. या अकाऊंटवरून स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सोशल मीडियावर स्वाती मोहोळ यांना मेसेज आक्षेपार्ह पोस्ट करत धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा कोण आहे ? याचा गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे.

Follow Us
पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता
Beed | पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता तर...
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम