AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संबंधी पोलीस ठाण्यात एक ई-मेल आला आहे. एकनाथ शिंदे हे थेट लोकांमध्ये मिसळतात. त्यांच्या सुख, दु:खाशी एकरुप होतात. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी आहे.

Eknath Shinde : मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी
Eknath Shinde
| Updated on: Feb 20, 2025 | 1:13 PM
Share

शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरु आहे. मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसाकडून या मेलचा तपास सुरू आहे. मंत्रालय पोलीस, जेजे मार्ग पोलीस ठाण्यात हा धमकीचा मेल आला आहे.

अज्ज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्व तपास यंत्रणा सर्तक झाल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून निनावी धमकी देण्याचे प्रकार सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा उल्लेख का केला? हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागचा उद्देश याची चौकशी सुरु आहे. अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे. याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती. मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत.

एकनाथ शिंदे आज कुठे आहेत?

एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये आहेत. महायुतीचे नेते दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे हे थेट लोकांमध्ये मिसळतात. त्यांच्या सुख, दु:खाशी एकरुप होतात. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी आहे. पक्ष संघटना अधिक बळकट करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात ठाकरे गटातून शिवसेनेत इनकमिंग सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बऱ्यापैकी पक्ष विस्तार केला आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून राज्यभरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.